महत्त्त्वाच्या बातम्या
By Admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:40+5:302015-10-03T00:20:40+5:30
स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव
स मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभावउमरेड : तालुक्यातील बहुतांश गावांमधील स्मशानभूमीतील दहनशेडची दुरवस्था झाली असून, मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्काराच्यावेळी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने स्मशानभूमीच्या दुरुस्ती तसेच सुविधांच्या निर्मितीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.***शहरात जडवाहनांना प्रवेशबंदी करामौदा : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून, रस्त्यांचीही दैनावस्था झाली आहे. त्यामुळे जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ***पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवाकामठी : तालुक्यातील काही गावांमधील पांदण रस्त्यांवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदर रस्ते अरुंद झाले असून, शेतीची वहिवाट करण्यास शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***जवाहर विहिरी वाटपात घोळ सावनेर : मनरेगाअंतर्गत पूर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना जवाहर विहिरींचे वाटप करण्यात आले. यात काही गरीब लाभार्थ्यांना डावलण्यात आले असून, काही श्रीमंत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. *** कन्हान नदीचे अस्तित्व धोक्यातखापरखेडा : सावनेर तालुक्यातील कन्हान व कोलार नदीच्या पात्रातून पोकलॅण्ड मशीनद्वारे रेतीचे उत्खनन केले जात आहे. या नद्यांच्या पात्रात खोल खड्डे तयार झाले असून, या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी, या रेतीउत्खननाला कायमचा आळा घालण्याची मागणी पर्यवरण तज्ज्ञांनी केली आहे. ***पाटचऱ्या बुजल्याने शेतकरी त्रस्तरामटेक : तालुक्यातील पेंच प्रकल्पाच्या कालव्यावर पाटचाऱ्यांचे जाळे विणण्यात आले आहे. हल्ली या पाटचऱ्या बुजल्याने त्या साफ करण्याची गरज आहे. सदर कामे उन्हाळ्यात करणे अपेक्षित आहे. मात्र, या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. सदर कामे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ***