महत्त्वाच्या बातम्या... जोड...०१
By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:25+5:302015-10-03T00:20:25+5:30
प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Next
प रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातखापरखेडा : कोळशाची भुकटी व फ्लाय ॲशची वाहतूक तसेच वीज केंद्रामुळे परिसरात हल्ली वायू प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वासाचे आजार जडायला सुरुवात झाली आहे. या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. ***प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढलाकळमेश्वर : शहरात व ग्रामीण भागात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर प्रचंड वाढला आहे. त्या पिशव्यांमुळे जमीन खराब होत असून, त्या खाल्ल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या पिशव्यांच्या विक्री तथा वापरावर बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ***कृषिपंपाचे बिल रीडिंगप्रमाणे द्या!नरखेड : शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या विजेचे बिल सरासरी अथवा अश्वशक्तीप्रमाणे दिले जाते. वास्तवात शेतकरी वापरत असलेल्या विजेपेक्षा बिलाची रक्कम अधिक असल्याने बिले थकीत राहतात. त्यातच वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना रीडिंगप्रमाणे बिले द्यावे, अशी मागणी मदन कामडे यांनी केली आहे. **अवैध उत्खननाला आळा घालाउमरेड : तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात मुरमाचे खोदकाम केले जात आहे. कमी रॉयल्टी भरून अधिक खोदकाम केले जात असल्याने शासनाचा महसूल बुडत असून, पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. त्यामुळे या उत्खननाला आळा घालण्याची मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.***कृषी विभागाने जनजागृती करावीरामटेक : कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना विविध शेतीपयोगी साहित्य अनुदानावर दिले जाते. याची जाहिरात केली जात नसल्याने शेतकऱ्यांना माहिती होत नाही. त्यामुळे सदर साहित्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***कमी दाबाच्या विजेमुळे नुुकसानसावनेर : तालुक्यातील इंदापूर शिवारातील ट्रान्सफार्मरवर ४० पेक्षा अधिक मोटरपंप आहेत. या ट्रान्सफार्मरमधून क्षमतेपेक्षा अधिक विजेचा वापर होत असल्याने कमी दाबाच्या विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे मोटरपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून या शिवारात नवीन ट्रान्सफार्मर लावण्याची मागणी जोर धरत आहे.***