महत्वाची बातमी पान २ : प्रतिज्ञापत्राचे नमुने
By Admin | Published: April 11, 2015 01:40 AM2015-04-11T01:40:23+5:302015-04-11T01:40:23+5:30
प्रतिज्ञापत्राचे नमुने आता मामलेदार कार्यालयातच उपलब्ध
प रतिज्ञापत्राचे नमुने आता मामलेदार कार्यालयातच उपलब्धसासष्टीत सेवा सुरू : लोक वकील व एजंटाच्या भुर्दंडापासून मुक्तमडगाव : प्रशासनाचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, या उद्देशाने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सुप्रशासनाचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. विविध दाखले घेण्यासाठी लोकांना जे प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागते त्याचे विहित नमुने आता मामलेदार कार्यालयातच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लोकांना आता प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यासाठी वकिलाकडे किंवा एजंटाकडे हेलपाटे घालण्यासाठी सुटका मिळाली आहे.दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी सचिन शिंदे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, ही योजना यापूर्वी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी उत्तर गोव्यात सुरू केली होती. यासाठी त्यांनी विविध दाखले घेण्यासाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केले जाते त्याचे विहित नमुने तयार केले होते, त्याचीच अंमलबजावणी आता दक्षिण गोव्यात केली जाते, असे त्यांनी सांगितले.या योजनेची माहिती अशी की, वेगवेगळे दाखले नेण्यासाठी जी प्रतिज्ञापत्रे लागतात त्यांचा तांत्रिक मजकूर जवळपास एकसारखाच असतो. हा मजकूर आता लिखित स्वरूपात नागरिकांना प्राप्त होणार आहे. आपली वैयक्तिक माहिती भरण्यासाठी या नमुन्यात मोकळ्या जागा सोडल्या आहेत. त्या जागा लोकांनी स्वत: भरायच्या आहेत. या अर्जावर ५0 रुपयांचा नॉन ज्युडिशियल कोर्ट फी लावून तो सादर करायचा आहे.या पध्दतीमुळे लोकांचे वकील किंवा एजंटाकडे जाण्याचे हेलपाटे वाचतील, असे शिंदे म्हणाले. असे अर्ज तयार करून देण्यासाठी लोकांकडून २५0 ते ३00 रुपये यापूर्वी आकारले जायचे. आता हे काम निशुल्क होणार आहे. केवळ ५0 रुपयांची कोर्ट फीने आता हे काम होणार आहे, असे ते म्हणाले.सासष्टीचे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शुक्रवार १0 एप्रिलपासून ही सेवा सासष्टीच्या मामलेदार कार्यालयात उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा लोकांना निश्चितच होईल, असे ते म्हणाले. या कार्यालयात दिवसाकाठी अशा अर्जांसाठी किमान ४0 ते ५0 अर्ज येतात. त्या सर्वांना आता दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.सध्या मडगावात सुरू झालेली ही सेवा दक्षिण गोव्यातील इतर तालुक्यांतही पसरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)