देशातील रेल्वेस्थानकांच्या खासगीकरणाबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:33 AM2020-07-21T10:33:06+5:302020-07-21T10:41:12+5:30
मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एमसीसीआय) ने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली.
नवी दिल्ली/कोलकाता - भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील १५१ प्रवासी गाड्यांचे खासगीकरण करून त्यांना खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता केंद्र सरकार देशातील रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना खासगी क्षेत्राच्या ताब्यात देण्याबाबत योजना आखत आहे. त्यासाठी लिलाव पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली.
मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एमसीसीआय) ने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. तसेच रेल्वेगाड्यांच्या खासगीकरणासाठी बोली लागल्या असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे गोयल यांनी यावेळी सांगितले.
रेल्वेस्थानकांचे खासगीकरण करण्याबाबत गोयल म्हणाले की, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानंतर लिलाव पद्धतीने ही रेल्वे स्थानके खासगी क्षेत्रांकडे हस्तांतरीत केली जातील. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये माल गलियारा योजनेसाठी आवश्यक तेवढी जमीन पश्चिम बंगाल सरकारने या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष विभागाकडे हस्तांतरीत केलेली नाही, असेही गोयल यांनी सांगितले.
यावेळी कोलकातामधील मेट्रो वाहतुकीबाबत विचारले असता रेल्वेमंत्री म्हणाले की, जर राज्य सरकारने परवानगी दिली तर कोलकात्यामध्ये मेट्रो सेवा सुरू होईल. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या विमान आणि उपनगरीय रेल्वेसेवा सध्या सुरू करण्याच्या विरोधात आहेत. जर मेट्रोची वाहतूक आताच सुरू केली तर कोरोनामुळे परिस्थिती बिघडू शकते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी