उत्तर प्रदेशमध्ये 4 मोठ्या अधिका-यांवर प्राप्तिकर विभागाचा छापा

By Admin | Published: May 24, 2017 02:34 PM2017-05-24T14:34:17+5:302017-05-24T14:34:17+5:30

प्राप्तिकर विभागानं राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांसह 4 ऑफिसर्सच्या 22 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.

Impressions of Income Tax Department on 4 big officers in Uttar Pradesh | उत्तर प्रदेशमध्ये 4 मोठ्या अधिका-यांवर प्राप्तिकर विभागाचा छापा

उत्तर प्रदेशमध्ये 4 मोठ्या अधिका-यांवर प्राप्तिकर विभागाचा छापा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 24 -  उत्तर प्रदेशच्या नोकरशहांवर मोठी कारवाई करत प्राप्तिकर विभागानं राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांसह 4 ऑफिसर्सच्या 22 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. मेरठ, दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये ही छापेमारी केली आहे. गाझियाबादचे माजी डीएम विमल शर्मा यांच्या घरीही छापा टाकण्यात आला आहे.

शर्मा सद्यस्थितीत नोएडा अथॉरिटीचे अडिशनल CEO आहेत. मेरठची RTO ममता शर्मा, बागपतचे माजी डीएम हृदय शंकर तिवारी यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. तिवारी सध्या उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य विभागात कार्यरत आहेत. प्राप्तिकर विभागानं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून, छापेमारीच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारचे नोकरशाह यांच्या संदर्भातील तीन प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, IAS हृदय शंकर तिवारी यांच्याविरोधात दिल्ली, लखनऊ, मेरठ, बागपत, ग्रेटर नोएडासहीत 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तिवारी सध्या उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य विभागात संचालक पदावर कार्यरत आहेत. IAS विमल कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी ममता शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. मेरठ, नोएडा आणि मैनपुरीमधल्या जवळपास 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर सत्येंद्र कुमार सिंह यांच्याही कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. सध्या ते उत्तर प्रदेशमधल्या विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत. या प्रकरणात लखनऊ आणि नोएडामध्ये 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 

Web Title: Impressions of Income Tax Department on 4 big officers in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.