सुधारित- उष्माघात ८ बळी - (मुख्य बातमी करणे)

By admin | Published: June 6, 2014 11:44 PM2014-06-06T23:44:09+5:302014-06-06T23:44:09+5:30

नागपुरात उष्माघाताचे ८ बळी

Improved- 8 victims of heat stroke ((News Head) | सुधारित- उष्माघात ८ बळी - (मुख्य बातमी करणे)

सुधारित- उष्माघात ८ बळी - (मुख्य बातमी करणे)

Next
गपुरात उष्माघाताचे ८ बळी

विदर्भ होरपळला : पारा ४७ अंशावर

नागपूर: आग ओकणार्‍या सूर्याच्या प्रकोपामुळे नागपुरात उष्माघाताने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक तापमानाचा पशुपक्ष्यांनाही फटका बसला. शुक्रवारी तापमानाने विक्रमी उंची गाठत ४७ अंश से. चा टप्पा पार केला. विदर्भात चंद्रपूर, वर्धा व ब्रšापुरीत ४७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
नागपूर पोलिसांनी आठ जणांचे मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी अनोळखी मृतदेह शासकीय इस्पितळांकडे शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
नागपुरात सक्करदरा भागातील धरती डेकोरेशन गोदामाजवळ एक ४५ वर्षीय अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. कॉटनमार्केट गेट क्रमांक १ च्या आत ४५-५० वयोगटातील अनोळखी रिक्षाचालक रिक्षातच मृतावस्थेत आढळला. लकडगंज हद्दीतील जुना भंडारामार्गावरील सुदर्शन चौकातील वाहतूक पोलिसांच्या बुथजवळ अंदाजे ६०-६५ वर्षीय अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली. अजनी हद्दीतील कुंजीलालपेठ येथे अंदाजे ५५ ते ६० वर्षीय इसम मृत आढळला. याशिवाय वर्धा रोड पांजरी रोडवर एका २८ वर्षीय तरुणाचा, विश्वकर्मानगर येथे एका ५० वर्षीय व्यक्तीचा आणि धरमपेठ खरे टाऊन परिसरात दोन आणि वाडीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
३ जून २००३ मध्ये नागपुरात ४७.७ अंश से. तापमानाची नोंद झाली होती. या विक्रमी तापमानापेक्षा फक्त एक अंशाने कमी तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. एकीकडे मान्सून केरळात दाखल झाला असताना दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात मात्र तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. (प्रतिनिधी)
-------------
विदर्भातील तापमान (अंश. से.)
चंद्रपूर ४७.५
ब्रšापुरी ४७.५
वर्धा ४७.२
नागपूर ४६.७
गोंदिया ४५.३
अकोला ४५.२
अमरावती ४४.६
यवतमाळ ४४.८
वाशीम ४२.८

Web Title: Improved- 8 victims of heat stroke ((News Head)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.