सुधारित-राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात
By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:01+5:302015-02-10T00:56:01+5:30
सुधारित-राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात
Next
स धारित-राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात-पालकमंत्र्यांनी घेतली स्वाईन फ्लूवर बैठक : उपाययोजनेसाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक नागपूर : स्वाईन फ्लूने राज्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ टक्के रुग्ण एकट्या नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डाच्या खाटा ३० वरून वाढवून ४५ करण्याचा व जनजागृतीसाठी पाच लाख पत्रके वितरित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, आमदार डॉ. मिलिंद माने, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे १९ बळी गेले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५ झाली आहे. स्वाईन फ्लू रुग्णाची निश्चित आकडेवारी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे रोज मेडिकल, मेयोसह, महानगरपालिका, आरोग्य विभागाची इस्पितळे व खासगी इस्पितळे नोडल अधिकाऱ्याला सायंकाळी ५ वाजतापूर्वी रिपोर्टिंग करतील. नोडल अधिकारी हा रोजचा अहवाल एकत्र करून तो पालकमंत्री ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व महापौरांना सादर करेल. -जनजागृतीसाठी पाच लाख पत्रकांचे वितरणपालकमंत्री म्हणाले, थंडी लांबल्याने व जनजागृतीअभावी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांनी आणि सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांची माहिती देणारी पाच लाख पत्रके लवकरच वितरित करण्यात येणार आहे. संशयित रुग्णाच्या मदतीसाठी काही फोननंबरही यात देण्यात आले आहेत.