सुधारित - सिंचन गैरव्यवहार

By admin | Published: September 3, 2015 11:52 PM2015-09-03T23:52:54+5:302015-09-03T23:52:54+5:30

सिंचन गैरव्यवहारात अटकसत्र सुरूच

Improved - Irrigation Practices | सुधारित - सिंचन गैरव्यवहार

सुधारित - सिंचन गैरव्यवहार

Next
ंचन गैरव्यवहारात अटकसत्र सुरूच
बाळगंगा प्रकल्प : आणखी तिघांना अटक
ठाणे : पेणमधील बाळगंगा सिंचन गैरव्यवहारात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी आणखी तिघांना अटक केली. त्यामुळे या घोटाळ्यात अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. यात गुन्हा दाखल झालेल्या काही अधिकार्‍यांनी केलेल्या विमानप्रवासाचा खर्च कंत्राटदार निसार खत्रीच्या बँक खात्यातून अदा केल्याचे उघडकीस आले आहे.
बाळगंगा प्रकल्प गैरव्यवहारप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर कंत्राटदार निसार खत्री आणि तत्कालीन अभियंता अधिकारी राजेश रिठे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर आता दहा दिवसांनी गुरुवारी दुपारी मुंबईतून कोकण पाटबंधारे विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट याच्यासह एफ. ए. एंटरप्रायजेसचे भागीदार अबीद फतेह मोहम्मद खत्री, जाहीद फतेह मोहम्मद खत्री यांना अट करण्यात आली.
निसार खत्री याच्या घरझडतीमध्ये सापडलेल्या कागदपत्रांची एसीबीने छाननी केली असता निसारने २०१२मध्ये स्टॅम्पपेपर खरेदी करून त्यावर २००६च्या कालावधीतील करारपत्र केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ओशिवरा, मजास व्हिलेज, जोगेश्वरी मुंबईतील रहेजा बिल्डर्सच्या आयरीश पार्कमध्ये जुलेका खत्री, हशामी आणि हरून खत्री यांच्या नावे ए-१६१, हरून फते मोहम्मद खत्रीच्या नावे ए-१६३ तर हरून आणि जुलेका यांच्या नावे ए-१६४ असे फ्लॅट्स असून त्यांची मर्सिडीज कारही आहे. त्याचबरोबर वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथील आयडेंटिटी बिल्डिंगच्या तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर प्रत्येकी १६०० चौ. फुटांचे दोन फ्लॅट आता खत्री आणि तालीफ खत्री यांच्या नावावर आहेत. तसेच निसार व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आणखी काही वाहनेही असून ती भिवंडी व विरार येथील पत्त्यांवर नोंदणी केल्याचे तपासात समोर आले आहे.
जलसंपदा विभागातील काही अधिकार्‍यांनी वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांमार्फत विमानप्रवास केला आहे. तसेच या प्रवासांचा खर्च निसारच्या बँक खात्यातून अदा झाल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली.
---------
रिठे आणि खत्रीला
न्यायालयीन कोठडी
रिठे आणि निसार खत्री या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान रिठेला चक्कर आल्याने तातडीने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. २५ ऑगस्ट रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर रिठे आणि खत्री या दोघांना अटक केली होती. खत्रीची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Improved - Irrigation Practices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.