सुधारित - तन्मय कर्णिक यांचे अपघाती निधन
By Admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:45+5:302015-09-02T23:31:45+5:30
तन्मय कर्णिक यांचे अपघाती निधन
त ्मय कर्णिक यांचे अपघाती निधन- मधु मंगेश कर्णिक यांना पुत्रशोकमुंबई : ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचे कनिष्ठ पुत्र तन्मय यांचे लोकल अपघातात मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडिल, भाऊ अनुप आणि बहिण अनुजा असा परिवार आहे. बुधवारी दुपारी ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंधेरी स्थानकात मंगळवारी रात्री ९.४८च्या सुमारास हार्बर लोकलमधून उतरत असताना तन्मय कर्णिक यांचा हात निसटला. त्यात गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना तत्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान मध्यरात्री २.१५ च्या सुमारास त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती अंधेरी जीआरपीचे पोलीस उपनिरीक्षक बाबूराव डोंगरे यांनी दिली.अपघाताच्या वेळी तन्मय रेल्वेरुळ ओलांडत होते का? की अन्य कोणते कारण आहे, याचा सखोल तपास अंधेरी जीआरपीकडून सुरू आहे. कर्णिक हे व्यवसायाने फार्मासिस्ट होते. नवी मुंबईत त्यांचे औषधांचे दुकान होते. (प्रतिनिधी)