अर्थ संकल्प प्रतिक्रीया सुधारीत

By Admin | Published: March 2, 2016 12:04 AM2016-03-02T00:04:44+5:302016-03-02T00:04:44+5:30

भावी प्रगतीसाठी चांगले

Improving the resolution of the Earth resolution | अर्थ संकल्प प्रतिक्रीया सुधारीत

अर्थ संकल्प प्रतिक्रीया सुधारीत

googlenewsNext
वी प्रगतीसाठी चांगले
जागतिक मंदीची चाहूल, देशातील औद्योगिक उत्पादनात झालेली घट आणि मान्सूनने दिलेला दगा लक्षात घेता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प चांगलाच म्हणावा लागेल. अतिश्रीमंतांना द्यावा लागणारा आयकर आणि तंबाखूवर कर वाढविणे याबद्दल तक्रार करता येणार नाही. छोटे करदाते व व्यावसायिकांना दिलेल्या सवलती योग्य आहेत. अर्थसंकल्प राबविणार्‍या यंत्रणेला जर भ्रष्टाचाराने ग्रासले नाही, तर हा अर्थसंकल्प भावी प्रगतीसाठी अधिक चांगले वातावरण निर्माण करू शकेल, अशी आशा वाटते.
- नंदिनी चपळगावकर (उद्योजिका)

ना फायदा, ना तोटा
मोठमोठ्या उद्योगांवर या अर्थसंकल्पाचा काय परिणाम होईल, ते माहीत नाही, पण एक सर्वसाधारण माणूस म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहिल्यास असे वाटते की, यामुळे सामान्य माणसांचा ना फायदा होणार आहे, ना कोणता तोटा. सामान्य जनजीवनावर कोणताही मोठा प्रभाव पडेल असे वाटत नाही. हे सगळे कागदोपत्री वाटते. ग्रामसडक योजनेसारख्या पायाभूत सुविधांवर तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्याचे समाधान वाटते.
- स्वाती जोशी

बँकिंग क्षेत्रातील तरतूद समाधानकारक
एक बँक कर्मचारी म्हणून हा अर्थसंकल्प सर्वसाधारण वाटतो. पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना आयकरात मिळालेली सूट फायदेशीर ठरेल. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, ग्रामसडक योजना यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल असे वाटते. नोकरदार व्यक्तींची एटीसीची मर्यादा वाढावी, अशी अपेक्षा होती. राष्ट्रीयीकृत बँक ांसाठी केलेली २५,००० कोटींची तरतूद समाधानकारक वाटते.
- अंजली कुलकर्णी (बँकर)

Web Title: Improving the resolution of the Earth resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.