मोदींवरून इम्रान खान देणार नवाज शरीफांना 'लेक्चर'

By admin | Published: September 29, 2016 06:27 PM2016-09-29T18:27:10+5:302016-09-29T19:32:55+5:30

पाकिस्तानातील विरोधी पक्षांकडून नवाज शरीफ यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी

Imran Khan gives Nawaz Sharif a lecture | मोदींवरून इम्रान खान देणार नवाज शरीफांना 'लेक्चर'

मोदींवरून इम्रान खान देणार नवाज शरीफांना 'लेक्चर'

Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 29 -  भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 35 ते 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानचं चांगलंच धाबं दणाणलं. भारताने हल्ला केला हे  पाकिस्तान सरकार आणि पाक मीडिया काही मानायलाच तयार नाही. मात्र, पाक मीडिया पंतप्रधान शरीफ यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेत आहे. शरीफ यांच्या कमकुवत भारत नीतीमुळेच भारताची हिम्मत वाढत आहे, त्यांना संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानची बाजू मांडता आली नाही म्हणून पाकला एकटं पाडण्यात भारत यशस्वी होत आहे असं पाक मीडियाने म्हटलं आहे. 
 
भारताच्या हल्ल्यानंतर  पाकिस्तान सरकार आणि पाक लष्करामध्ये किती सावळागोंधळ आहे हे स्पष्टपणे समोर आलं.  भारतानं केवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि यामध्ये आमचे दोन जवान मारले गेले असं पाकिस्तान सैन्य सांगत असल्याचा दावा डॉन, जिओ न्यूज, दुनिया न्यूज आदी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे. तर, दुसरीकडे भारताने केलेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तान सैन्याने तयार राहण्याचा आदेश पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिला आहे.  
 
त्याचवेळी, पाकिस्तानमधील पत्रकार हामिद मिर यांनी पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्यात भारताचे पाच जवान मारले गेल्याचा दावा केला आहे.
 
पाकिस्तानातील विरोधी पक्षांकडून मात्र नवाज शरीफ यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी तर शरीफ यांच्यावर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भारताच्या पंतप्रधानांना कसं उत्तर द्यावं हे शरीफ यांना कळत नाही. उद्या माझ्या रॅलीमध्ये मी मोदींना उत्तर देतो आणि शरीफ यांना दाखवून देतो की प्रत्युत्तर कसं द्यायचं असतं, असं पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान म्हणाले. शरीफ हे केवळ मुखवटा आहेत, राहील शरीफ हेच देश चालवत आहेत अशी टीका इम्रान यांनी यावेळी केली.  
 
उद्या इम्रान खान पाकिस्तानमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत, यावेळी भारताच्या पंतप्रधानांना सडेतोड उत्तर देऊ असं ते म्हणाले आहेत. 

Web Title: Imran Khan gives Nawaz Sharif a lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.