२०१४ मध्ये म्हणाले, मी पुन्हा येणार अन् आलेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:35 PM2024-10-17T13:35:48+5:302024-10-17T13:36:07+5:30

२०१४ मध्ये पदावरून दूर होताना ओमर अब्दुला यांनी मी पुन्हा येईन असे म्हटले होते. तो शब्द खरा करत ओमर अब्दुला पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

In 2014, omar abdullah said, I will came again and they have come | २०१४ मध्ये म्हणाले, मी पुन्हा येणार अन् आलेच

२०१४ मध्ये म्हणाले, मी पुन्हा येणार अन् आलेच

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला व त्यांच्या पाच मंत्र्यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१४ मध्ये पदावरून दूर होताना ओमर अब्दुला यांनी मी पुन्हा येईन असे म्हटले होते. तो शब्द खरा करत ओमर अब्दुला पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

२०१९मध्ये राज्यघटनेचे ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात पहिल्यांदाच लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले आहे. काँग्रेसने या सरकारला पाठिंबा दिला असला तरी तो पक्ष मंत्रिमंडळात सहभागी झालेला नाही. 

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी, मंत्री सकीना मसूद (इटू), जावेद दार, जावेद राणा आणि सतीश शर्मा या सहा जणांनी आपल्या पदाची शपथ घेतली.  ओमर अब्दुल्ला हे काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी ओमर यांचे आजोबा शेख अब्दुल्ला, वडील फारूक अब्दुल्ला हेही याआधी विराजमान झाले होते. तोच मान पुन्हा ओमर अब्दुल्ला यांना मिळाला आहे.

बाहेरून पाठिंबा : काँग्रेस
- जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले.
- मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी पक्षाने राज्य मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.  आहे. 
पूर्ण सहकार्य : पंतप्रधान 
ओमर अब्दुल्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार अब्दुल्ला यांना संपूर्ण सहकार्य करेल. 
 

Web Title: In 2014, omar abdullah said, I will came again and they have come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.