Crime: पतीला काही मिनिटांत पुन्हा ठेवायचे होते संबंध; पत्नीने नकार देताच त्याने दाखवला राक्षसी अवतार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:44 PM2022-12-08T19:44:15+5:302022-12-08T19:44:54+5:30

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पत्नीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने तिची हत्या केली. 

 In Amroha, Uttar Pradesh, the husband killed his wife with the help of his brother after she refused to have a relationship again | Crime: पतीला काही मिनिटांत पुन्हा ठेवायचे होते संबंध; पत्नीने नकार देताच त्याने दाखवला राक्षसी अवतार

Crime: पतीला काही मिनिटांत पुन्हा ठेवायचे होते संबंध; पत्नीने नकार देताच त्याने दाखवला राक्षसी अवतार

Next

नवी दिल्ली : शारिरीक संबंध ठेवण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तीने काही तासातच पत्नीला दोनदा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला. मात्र पत्नीने नकार दिल्याने त्याने राक्षसी अवतार दाखवत तिची हत्या केली. खरं तर ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील आहे. अमरोहा जिल्हा पोलिसांनी केलेल्या तपासात पतीचा क्रूरपणा समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता संपूर्ण घटना समोर आली.

पतीने दाखवला राक्षसी अवतार 
अमरोहा जिल्ह्यातील कोतवाली येथील मोहल्ला सराय कोहना येथील बेकरी संचालक अन्वर याने पत्नी रुखसारसोबत 5 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास संबंध ठेवले होते. काही वेळाने अन्वरने पत्नीला पुन्हा संबंध ठेवण्यास सांगितले असता तिने नकार दिला. पत्नीने वाद सुरू केल्याने रागाच्या भरात अन्वरने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला आणि पत्नीचा मृतदेह प्लास्टिकमध्ये भरून दुचाकीवरून रतुपुरा गावातील जंगलाच्या काठावर रस्त्यावर फेकून दिला. या घटनेवरून मुरादाबाद जिल्हा अमरोहा नगर कोतवाली येथे पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

पोलिसांच्या चौकशीत आरोपी पतीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पतीचे हे कृत्य ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रस्त्याच्या कडेला मृतदेह पाहून गावकऱ्यांनी मुरादाबाद पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचे फोटो अनेक जिल्ह्यांमध्ये मृत महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पाठवले होते. पोलिसांनी आजूबाजूच्या जिल्ह्यातील अशा महिलांची माहिती देखील गोळा केली, ज्यांची बेपत्ता झाल्याची नोंद नुकतीच झाली होती. फोटोवरून संबंधित मृतदेहाची ओळख पटली. 

आरोपी आणि त्याच्या भावाला घातल्या बेड्या
त्यानंतर अमरोहा पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि या घटनेत त्याने आपला भाऊ दानिशची मदत घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title:  In Amroha, Uttar Pradesh, the husband killed his wife with the help of his brother after she refused to have a relationship again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.