आंध्र प्रदेशात भीषण अपघात, भरधाव ट्रेनखाली चिरडून सहा जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 08:29 AM2022-04-12T08:29:34+5:302022-04-12T08:32:08+5:30

Andhra pradesh Railway Accident: आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री उशिरा कोणार्क एक्स्प्रेसखाली सापडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. या संदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे.

In Andhra Pradesh, six people were killed and several others were injured in a tragic accident | आंध्र प्रदेशात भीषण अपघात, भरधाव ट्रेनखाली चिरडून सहा जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी 

आंध्र प्रदेशात भीषण अपघात, भरधाव ट्रेनखाली चिरडून सहा जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी 

googlenewsNext

अमरावती - आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री उशिरा कोणार्क एक्स्प्रेसखाली सापडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. या संदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, गुवाहाटीला जणारी एक सुपरफास्ट एक्स्प्रेस काही तांत्रिक समस्येमुळे बटुवा गावाजवळ थांबली असताना काही प्रवासी त्यामधून उतरले. दरम्यान, दुसऱ्या बाजूने येत असलेल्या भरधाव कोणार्क एक्स्प्रेसखाली हे प्रवासी सापडले.

श्रीकाकुलमचे पोलीस अधीक्षक जी. आर. राधिका यांनी सांगितले की, आतापर्यंत सहा मृतदेहांची ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अजून कुणाचा मृत्यू झाला आहे का याची खातरजमा करण्यासाठी पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

श्रीकाकुलम जिल्हा सूचना विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रात्री सुमारे ९ वाजता सिगदम आणि चिपुरपल्ली रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, कोईंबतूर-सिलचर एक्स्प्रेस (१२५१५)मधील काही प्रवाशांनी विशाखापट्टणम पलासा मुख्य लाईनच्या मध्य भागात साखळी ओढून ट्रेन थांबवली. त्यानंतर काही लोकांनी दुसऱ्या बाजूच्या ट्रॅकवर धावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस त्या ट्रॅकवर भरधाव वेगाने आली. त्याखाली हे लोक सापडून अपघात झाला. 

Web Title: In Andhra Pradesh, six people were killed and several others were injured in a tragic accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.