कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना, रक्तबंबाळ स्थितीत सापडला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 11:43 AM2024-08-21T11:43:43+5:302024-08-21T13:07:15+5:30

Kolkata Crime News: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

In another shocking incident in Kolkata, a woman's body was found in a pool of blood | कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना, रक्तबंबाळ स्थितीत सापडला महिलेचा मृतदेह

कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना, रक्तबंबाळ स्थितीत सापडला महिलेचा मृतदेह

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोलकात्यामधील आनंदपूर परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेचा मृतदेह रक्तबंळाळ स्थितीत सापडला असून, ती कोण होती, कुठली होती, याबाबतची कुठलीही माहिती समोर येऊ शकलेली नाही. 

कोलकात्यामधील आनंदपूर परिसरामध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत सापडला. तसेच तिच्या शरीरावर जखमांच्या खुणाही दिसून आल्या. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. 
आता पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच महिलेची हत्या कशी झाली आणि का झाली? तसेच तिच्यावर बलात्कार झाला होता का, हे समोर येणार आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच या महिलेशी संबंधित माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

दरम्यान, कोलकाता बलाल्कार प्रकरणामुळे आधीच देशात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.  ९ ऑगस्ट रोजी कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. तिच्चा मृतदेहाच्या पोस्टमार्टेममधून या महिला डॉक्टरवर बलात्कार झाला होता, अशी माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. तसेच आता या प्रकरणाचा पुढील तपास हा सीबीआयकडून सुरू आहे.  

Web Title: In another shocking incident in Kolkata, a woman's body was found in a pool of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.