कौतुकास्पद! वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माकडासाठी युवक 'देवदूत', रिक्षातून गाठलं रूग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 02:29 PM2023-11-29T14:29:48+5:302023-11-29T14:30:14+5:30

वीजेच्या धक्क्याने तडफडत असलेल्या माकडासाठी एक युवक देवदूत बनला.

 In Arrah, Bihar, an electrocuted monkey was taken to the hospital by a youth in a rickshaw | कौतुकास्पद! वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माकडासाठी युवक 'देवदूत', रिक्षातून गाठलं रूग्णालय

कौतुकास्पद! वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माकडासाठी युवक 'देवदूत', रिक्षातून गाठलं रूग्णालय

वीजेच्या धक्क्याने तडफडत असलेल्या माकडासाठी एक युवक देवदूत बनला. बिहारमधील या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. येथील आरा परिसरात एका युवकाने वेदनेने व्याकूळ झालेल्या माकडाला उपचारासाठी रूग्णालयात नेले अन् त्याचा जीव वाचवला. वीजेचा धक्का लागल्यानंतर माकड कोसळले आणि जमिनीवर तडफडू लागले. तडफडत असलेल्या माकडाला पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली पण कोणीच त्याला स्पर्श करण्याचे धाडस केले नाही. मात्र एक युवक या गर्दीला अपवाद ठरला आणि त्याने मदतीसाठी धाव घेतली. चंदन नावाच्या या युवकाने रिक्षा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्याने जखमी माकडाला रिक्षातून रूग्णालयात दाखल केले. 

संबंधित तरूणाने आरा येथील एका खासगी रूग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार देत त्याला पशुसंवर्धन विभागात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर चंदनने माकडाला प्रथम दुसऱ्या खासगी दवाखान्यात नेले व तेथे प्राथमिक उपचार करून नंतर त्याला पशुसंवर्धन विभागाच्या रुग्णालयात नेले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उशीर झाला असता तर माकडाचा जीव गेला असता - डॉक्टर 
माकडावर उपचार करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी माकड पूर्णपणे जळाल्याचे सांगितले. त्याला श्वास घेताना त्रास होत होता. त्याला इथे आणायला अजून थोडा उशीर झाला असता तर कदाचित ते दगावलेही असते. त्याला वेळीच प्राथमिक उपचार करून येथे आणण्यात आल्याने जीव वाचला, असे डॉक्टरांनी सांगितले. चंदनने दाखवलेली तत्परता आणि त्याच्या मेहनतीला सर्वजण दाद देत आहेत. रूग्णालयातील डॉक्टरांनी देखील युवकाच्या धाडसाचे विशेष कौतुक केले.  

Web Title:  In Arrah, Bihar, an electrocuted monkey was taken to the hospital by a youth in a rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.