बिहारमध्ये 11 वर्षांत मुस्लीम लोकसंख्या वाढली, हिंदू घटले; अशी आहे 2011 अणि 2023 ची आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 03:05 PM2023-10-03T15:05:36+5:302023-10-03T15:07:30+5:30
Bihar Caste Survey : याशिवाय, अहवालात ख्रिश्चन, शिख, बौद्ध आणि जैन समाजाची आकडेवारीही देण्यात आली आहे. यानुसार, ख्रिश्चन, शिख आणि जैन समुदायाची लोकसंख्याही घटली आहे.
बिहार सरकारने नुकतीच जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. यात हिंदू, मुस्लीम, शीख ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध यांच्यासह राज्यातील सर्व धर्म आणि जातींच्या लोकसंख्येची आकडेवारी देण्यात आली आहे. यापूर्वी 2011 मध्ये जनगणना झाली होती. तेव्हाच्या जनगणनेची आकडेवारी आणि ताज्या जातीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार, हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्येत काही प्रमाणावर बदल झाला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत किंचित घट झाली असून मुस्लीम लोकसंख्या वाढली आहे. 2011 ते 2023 दरम्यान येथील हिंदु लोकसंख्या 0.8 टक्क्यांनी कमी झाली, तर तर मुस्लीम लोकसंख्या 0.8 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय, अहवालात ख्रिश्चन, शिख, बौद्ध आणि जैन समाजाची आकडेवारीही देण्यात आली आहे. यानुसार, ख्रिश्चन, शिख आणि जैन समुदायाची लोकसंख्याही घटली आहे.
अशी आहे 2011 आणि 2023 ची आकडेवारी -
2011 च्या जनगणनेची आकडेवारी -
हिंदू - 82.7%
मुस्लीम - 16.9%
ख्रिश्चन - 0.12%
शिख - 0.02%
बौद्ध - 0.02%
जैन - 0.02%
इतर - 0.1%
बिहार जात जनगणना 2023 ची आकडेवारी -
हिंदू - 81.9%
मुस्लीम - 17.7%
ख्रिश्चन - 0.05%
शिख - 0.01%
बौद्ध - 0.08%
जैन - 0.009%
इतर - 0.12%