कॉन्स्टेबलने महिला पोलिसाला केली मारहाण; पोलीस स्टेशनचे प्रमुख म्हणाले, "चुकून झालं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 01:16 PM2023-06-14T13:16:37+5:302023-06-14T13:16:54+5:30
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इथे एका महिला कॉन्स्टेबलला पोलीस स्टेशनच्या ड्रायव्हर कॉन्स्टेबलने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, कॉन्स्टेबल महिला पोलिसाला सर्वांसमोर मारहाण करत आहे. यादरम्यान अनेक पोलिसही तिथे उभे असल्याचे दिसते आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत असे सांगण्यात येत आहे की, भोजपूर जिल्ह्यातील कोइलवार गावातील रहिवासी असलेल्या मो. मेराज जफर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी अर्जात आरोप केला आहे की, मो. शमीम अहमद हे त्यांच्या घरासमोर निर्धारित जागेपेक्षा जास्त जागेत घर बांधत आहेत. याप्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेले होते.
हवालदाराने लोकांनाही केली मारहाण
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोइलवार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पोलिसांच्या पथकाच्या चालकाने स्थानिकांना शिवीगाळ देखील केल्याचे बोलले जात आहे. शिवाय चालक हवालदाराने शिवीगाळ करून मारहाणही केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यावेळी उपस्थित लोकांनी घटनेचा व्हिडीओ बनवला असता, संतप्त हवालदाने मोबाईल हिसकावून घेतला आणि गोळी मारण्याची धमकी दिली. अशातच उपस्थित महिला पोलीस हलावदार ड्रायव्हरला थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे चालक हवालदाराने सर्वांसमोर महिला शिपायाच्या कानाखाली मारली.
@NitishKumar जी, @yadavtejashwi जी... क्या यही है आपके सुशासन की परिभाषा!!
— Aditi Choudhary (@AditiCh55268810) June 14, 2023
भोजपुर में एक सिपाही सबके सामने महिला जवान को थप्पड़ जड़ देता है और थाना अध्यक्ष कहते हैं की गलती से हाथ चल गया। #biharpolice#Biharpic.twitter.com/zOS7yl7xOG
पोलीस स्टेशनचे प्रमुख म्हणाले...
याप्रकरणी कोइलवार पोलीस ठाण्याचे प्रमुख अविनाश कुमार यांनी सांगितले की, जमीन अतिक्रमण प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिला कॉन्स्टेबल चालकाला तिथून हटवत होती. हवालदाराला वाटले की स्थानिक लोकं आहेत आणि चुकून त्याने हात उचलला.