रात्रीच्या वेळी भेटणं प्रेमी युगुलाला भोवलं; गावकऱ्यांनी आक्षेर्पाह स्थितीत पकडलं अन् लावलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 03:37 PM2024-01-20T15:37:59+5:302024-01-20T15:43:13+5:30
रात्रीच्या वेळी प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर गावकऱ्यांना सापडला अन् एकच खळबळ माजली.
रात्रीच्या वेळी प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर गावकऱ्यांना सापडला अन् एकच खळबळ माजली. हे प्रेमीयुगुल संबंधित तरूणीच्या घरात गावकऱ्यांना रंगेहाथ सापडले. दोघांना पाहताच बघ्यांनी आरडाओरडा केल्याने गावकरी गोळा झाले. प्रेमी युगुल सापडल्यानंतर गावकऱ्यांनी दोघांचे लग्न लावले. बिहारमधील जमुई जिल्ह्यातील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. येथील धरमपूर गावातील सुमित कुमार आणि महापूर गावातील रहिवासी सिमरन कुमारी यांच्यात प्रेमसंबंध होते.
प्रियकर सुमित प्रेयसी सिमरनला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी गेला होता. कुटुंबीयांनी सांगितले की, सुमित कुमार रात्री अंधाराचा फायदा घेऊन घरात घुसला आणि त्याला सिमरनसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. याची चाहूल लागताच आम्ही दरवाजा उघडला असता, पकडले जाण्याच्या भीतीने सिमरनने सुमितला घरात ठेवलेल्या बॉक्समध्ये बंद करून ठेवले.
गावकऱ्यांनी लावलं लग्न
संशय आल्यानंतर गावकरी गोळा झाले. मग त्यांनी शोध घेतला असता सुमित बॉक्समध्ये लपला असल्याचे उघड झाले. या प्रकरणी प्रियकर सुमितने सांगितले की, मागील दीड वर्षांपासून आमच्यात प्रेमसंबंध सुरू आहेत. इंस्टाग्रामवरून आमची ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि या चर्चेनंतर या प्रकरणाचे रुपांतर प्रेमप्रकरणात झाले. सुमित सिमरनला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी तिच्या घरी अनेकदा गेला होता. यावेळी देखील असेच झाले सिमरनने फोन करताच रात्री १०.३० वाजता सुमित तिच्या घरी गेला होता. पण, गावकऱ्यांना संशय आला अन् दोघे सापडले.
दरम्यान, हे प्रेमी युगुल सापडताच गावकऱ्यांनी लग्न लावले. यानंतर दुसऱ्या दिवशी स्थानिक खैरा पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही प्रेमी युगुलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. मात्र, पोलिसांनाही ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.