सर्कस पाहताना जडलं प्रेम! रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला अन् गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:34 PM2023-01-22T15:34:19+5:302023-01-22T15:34:55+5:30
बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे गावकऱ्यांनी लपून भेटत असलेल्या प्रियकर आणि प्रेयसीचा विवाह करून दिला आहे. छुप्या पद्धतीने भेटणाऱ्या प्रेमी युगुलांना लग्नाच्या बंधनात बांधून उघडपणे भेटण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. खरं तर ही घटना बिहारच्या जेहानाबादची आहे, जिथे रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला लोकांनी पकडले आणि नंतर दोघांचे लग्न लावून दिले. जेहानाबाद जिल्ह्यातील शकूराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील चिकसौरा गावात एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. प्रेमी युगुलांना गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचे थेट लग्नच लावून दिले.
यादरम्यान प्रियकर घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडले. गावकऱ्यांनी दोघांची विचारपूस केली असता दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे आमची सर्कस पाहताना ओळख झाली असल्याचे या जोडप्याने सांगितले.
मंदिरात लावलं लग्न
यानंतर ग्रामस्थांनी दोघांना पकडून गावात आणले. त्यानंतर पंचायत प्रमुख गिनी देवी आणि सरपंच सुभम कुमार यांच्या उपस्थितीत भगवान विष्णूच्या मंदिरात विधीपूर्वक विवाह झाला. गया जिल्ह्यातील टेकरी ब्लॉकमधील पंचनपूर येथील रहिवासी विकास कुमार असे या तरुणाचे नाव आहे.
15 दिवसांच्या प्रेमानंतर लग्न
प्रियकर आणि प्रेयसीमध्ये 15 दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होते असे सांगितले जात आहे. प्रियकराने सांगितले की, तो सर्कसमध्ये काम करण्यासाठी महदीपूरला आला होता आणि सर्कस दाखवताना गुडिया या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर विकास आणि गुडिया दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्धार केला. विकास त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या गावात गेला असता गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि त्यांचे लग्न लावून दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"