धक्कादायक! "हुंड्यात हवे होते महागडे जॅकेट...", सासरकडून न मिळाल्याने पत्नीला जागीच संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 11:34 AM2023-01-08T11:34:29+5:302023-01-08T11:38:05+5:30
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : देशभरातील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. बिहारमध्ये देखील थंडीचा पारा चढला आहे. अशा परिस्थितीत जॅकेटची मागणीही झपाट्याने वाढली आहे. पण, बिहारमधील छपरामधून जॅकेटवरून एक धक्कादायक घटना घडली आहे. खरं तर वैशाली जिल्ह्यातील विवाहित तरूणाने जॅकेटची मागणी पूर्ण न केल्याने पत्नीची हत्या केली. रितिका कुमारी असे मृत महिलेचे नाव असून ती छपराच्या मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील मंगाईडीह गावातील रहिवासी होती.
जॅकेट न मिळाल्याने केली हत्या
दरम्यान, वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालीचरण सिंग याच्यासोबत 8 महिन्यांपूर्वी रितिकाचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून हुंड्याची मागणी करून रितिकाचा छळ होत असल्याचा आरोप मृत रितीकाच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिकाच्या हत्येपूर्वी दोन दिवस आधी जॅकेटसाठी तिचा छळ करण्यात आला होता, याची माहिती तिने आईला दिली होती.
याप्रकरणी वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये मृत रितीकाची आई आणि मुफसिल पोलीस स्टेशन परिसरातील मगईडीह गावातील रहिवासी असलेल्या अनिता देवी यांनी सांगितले की, त्यांनी 2 मे 2022 रोजी आपल्या मुलीचे लग्न भोला सिंगचा मुलगा कालीचरण सिंग याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार केले.
आरोपीला अटक
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, लग्न झाल्यापासून त्यांच्या मुलीचा चारचाकी व इतर सामानासाठी छळ केला जात होता. मुलगी माहेरी पोहोचू नये म्हणून मोबाईलचा सिम क्रमांकही बदलण्यात आला. 7 महिन्यांनी म्हणजे 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी साडेसात वाजता अचानक सासरच्यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे लवकर या. मात्र, जावई म्हणजेच आरोपी कालीचरण आणि त्याच्या घरातील इतर सदस्यांनी मिळून तिची हत्या केली होती. शरीरावरील डाग पाहून मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली असता सत्य समोर आले. आरोपी कालीचरण सिंगला अटक करण्यात आली असून इतर 3 आरोपींची चौकशी केली जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"