G20 मध्ये परदेशी पाहुण्यांच्या थाळीत दिसणार खास पदार्थ, लिट्टी-चोखा वाढवणार टेस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 04:48 PM2023-09-09T16:48:24+5:302023-09-09T16:53:35+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या G20 शिखर परिषदत सहभागी झाले आहेत.
देशाच्या राजधानीत आजपासून दोन दिवसीय जी20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या G20 शिखर परिषदत सहभागी झाले आहेत. या राष्ट्रप्रमुखांसाठी खास पदार्थ तयार करण्यात आले आहेत. यात लिट्टी-चोखाचाही समावेश करण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना भारताचे विशेष सचिव मुक्तेश परदेशी म्हणाले, जी-20 नेत्यांसाठी बाजरीशी संबंधित पदार्थांसह भारतीय भोजन तयार करण्याचा निर्णय केवळ भारताचा समृद्ध पाककृती वारसाच दर्शवत नाही, तर तो शिखर परिषदेची एकता आणि सामायिक भविष्याच्या विषयाशीही सुसंगत आहे. या शिखर परिषदेचा विषय वसुधैव कुटुंबकम, असा आहे.
परदेशी म्हणाले, "2023 बाजरीचे वर्ष आहे, बाजरीशी संबंधित पदार्थही दिले जातील." मिठाईंसंदर्भात बोलताना परदेशी म्हणाले, भारतातील वेगवेगळ्या मिठाई विदेशी पाहुण्यांना दिल्या जातील. यात ऋतू लक्षात घेऊन घेवरही दले जाऊ शकते" तसेच, या परिषदेसाठी आलेले नेत ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्यांना तेथे नवीन बाजरीचे पदार्थ दिले जातील. बाजरी हे आशिया आणि आफ्रिकेतील बहुतांश लोकांमध्ये पारंपरिक भोजन मानले जाते. याशिवाय, सध्या भारतासह 130 हून अधिक देशांमध्ये बाजरीचे उत्पादन घेतले जाते.