अवघ्या १२ सेकंदात Twin Tower होणार उद्ध्वस्त; ३७०० किलो स्फोटकं, काही तास शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 05:17 PM2022-08-27T17:17:10+5:302022-08-27T17:17:20+5:30

ही इमारत पाडण्यासाठी जवळपास ९६४० खड्डे करत त्यात ३७०० स्फोटकं भरण्यात आली आहेत. निश्चित वेळी बटण दाबताच पत्त्याप्रमाणे हे टॉवर कोसळतील

In just 12 seconds the Twin Towers will collapse; 3700 kg of explosives, few hours left | अवघ्या १२ सेकंदात Twin Tower होणार उद्ध्वस्त; ३७०० किलो स्फोटकं, काही तास शिल्लक

अवघ्या १२ सेकंदात Twin Tower होणार उद्ध्वस्त; ३७०० किलो स्फोटकं, काही तास शिल्लक

googlenewsNext

नवी दिल्ली - नोएडामधील सेक्टर 93 ए. जिथं भ्रष्टाचाराच्या पायावर ३२ मजल्याची आणि १०३ मीटर उंच ट्विन टॉवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. हा ट्विन टॉवर पाडण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या परिसरातील आजूबाजूच्या सोसायट्यांमधील पिलर मजबूत करण्याचे काम सुरू आहे. उद्या म्हणजेच रविवारी दुपारी ठीक २.३० वाजता हा ट्विन टॉवर अवघ्या १२ सेकंदात जमीनदोस्त करण्यात येईल. याबाबत संबंधित कंपनीने तयारी पूर्ण केली आहे.

ही इमारत पाडण्यासाठी जवळपास ९६४० खड्डे करत त्यात ३७०० स्फोटकं भरण्यात आली आहेत. निश्चित वेळी बटण दाबताच पत्त्याप्रमाणे हे टॉवर कोसळतील. परंतु या घटनेची स्थानिक लोकांमध्ये भीती आहे. स्फोट घडवण्यापूर्वी आसपासच्या लोकांना घर सोडण्यास सांगत सुरक्षित स्थळी जाण्यास म्हटलं आहे. या परिस्थितीत धूळ आणि ढिगाऱ्यामुळे त्यांच्या फ्लॅटचे आणि सोसायटीचे नुकसान होऊ शकते. 

आसपासचे लोक झाले त्रस्त
एस्टर २ मध्ये राहणारे रवी कपूर सांगतात की त्यांचे घर ट्विन टॉवर्सच्या सर्वात जवळ आहे. उद्या टॉवर पाडले जाईल, पण मला आतापासून माझ्या घराची काळजी वाटते. त्यांनी घरावर सहा चादरी लावल्या आहेत. ते त्याच्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहतात. धूळ आणि घरात नुकसान होण्याची भीती असल्याची सर्वात मोठी चिंता त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी सुपरटेकविरोधात सुरुवातीपासूनच खटला लढणारे उदयभान तेतिया यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. उदयभान हे एमराल्ड कोर्टात आरडब्ल्यूएचे अध्यक्ष आहेत. ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त होत असल्याने ते खूप आनंदी दिसत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील माझ्या लढ्यामुळेच आज बेकायदा बांधकामे पाडली जात आहेत, याचा मला आनंद आहे, असे तेवतिया सांगतात. एका क्षणी आम्ही आणि आमच्या कुटुंबाने आशा सोडली होती असंही ते म्हणाले. 

७००-८०० कोटी धुळीला मिळणार
सुपरटेक ट्विन टॉवर्सच्या विध्वंसासाठी अंदाजे १७.५५ कोटी रुपये (Supertech Twin Towers Demolition Cost) खर्च अपेक्षित आहे. टॉवर पाडण्याचा हा खर्चही बिल्डर कंपनी सुपरटेक उचलणार आहे. या दोन टॉवरमध्ये एकूण ९५० फ्लॅट बांधण्यात आले असून ते बांधण्यासाठी सुपरटेक कंपनीने २०० ते ३०० कोटी रुपये खर्च केले होते. रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे टॉवर ज्या भागात बांधले गेले आहेत त्या जागेची किंमत सध्या १०००० रुपये प्रति चौरस फूट आहे. त्यानुसार, सुपरटेकच्या दोन्ही टॉवर्सची (Supertech Twin Towers Value) किंमत १००० कोटींच्या पुढे गेली आहे. मात्र, कायदेशीर खटल्यांमुळे या दोन्ही टॉवरच्या किमतीवर परिणाम झाला असून त्यांची सध्याची किंमत ७०० ते ८०० कोटी आहे. परंतु काही तासांनंतर ही रक्कम धुळीत मिळणार आहे. 

Web Title: In just 12 seconds the Twin Towers will collapse; 3700 kg of explosives, few hours left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.