हृदयद्रावक! लग्नासाठी दबाव टाकल्याने प्रियकर बनला राक्षस; महिलेसह तिच्या मुलाचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:24 PM2023-02-06T16:24:23+5:302023-02-06T16:24:51+5:30

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

In Kanpur, Uttar Pradesh, the boyfriend killed the woman and her son after women forcing him for marry   | हृदयद्रावक! लग्नासाठी दबाव टाकल्याने प्रियकर बनला राक्षस; महिलेसह तिच्या मुलाचा घेतला जीव

हृदयद्रावक! लग्नासाठी दबाव टाकल्याने प्रियकर बनला राक्षस; महिलेसह तिच्या मुलाचा घेतला जीव

googlenewsNext

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बिल्हौरच्या बलरामनगरमध्ये रविवारी पहाटे पारिचारिका आणि तिच्या 11 वर्षीय मुलाची महिलेच्या प्रियकराने गळा आवळून हत्या केली. यानंतर ही घटना आत्महत्या असल्याचे दाखवण्यासाठी मुलाचा मृतदेह लटकवण्यात आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने हत्येची कबुली देत ​​हत्येचे रहस्य उलगडले आहे.

पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंग यांनी सांगितले की, बलरामनगर येथील रहिवासी अशोक शुक्ला यांच्या घरात भाड्याच्या खोलीत राहणारी महिला आणि तिचा मुलगा मृत अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर खोलीचा दरवाजा उघडा दिसला. खरं तर बिधानू साढू येथील राजकुमार यांची पत्नी सीमा दिवाकर (38) हिचा मृतदेह पलंगावर पडला होता. तर इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आदित्य (11) या मुलाचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. 

महिलेसह तिच्या मुलाचा घेतला जीव  
मृत सीमा कन्नौज या जलालाबाद येथील सीएचसीमध्ये पारिचारिका म्हणून कार्यरत होत्या. पतीसोबत वाद झाल्यानंतर त्या सुमारे चार वर्षांपासून या वस्तीत भाड्याने राहत होत्या. पोलिसांनी त्याच घरात राहणाऱ्या अन्य तीन भाडेकरूंची चौकशी केली असता, वस्तीत राहणारा नरेंद्र यादव हा सकाळी आपल्या खोलीतून बाहेर आल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची कोठडीत चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याची या मृत महिलेशी मैत्री होती. ती माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळेच रविवारी पहाटे त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली. मुलाने आपल्या आईची हत्या करताना आरोपीला पाहिले होते. म्हणून आरोपीने 11 वर्षीय चिमुकल्याची हत्या करून मृतदेह लटकवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्येची माहिती आरोपी नरेंद्रच्या काकाने पोलीस नियंत्रण कक्षात दिली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची अधिक चौकशी केली जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: In Kanpur, Uttar Pradesh, the boyfriend killed the woman and her son after women forcing him for marry  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.