शाळकरी मुलांच्या बॅगेत सापडलं कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; शिक्षकांसह पालक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 01:53 PM2022-11-30T13:53:21+5:302022-11-30T13:53:43+5:30
या संपूर्ण प्रकारानंतर शाळांनी विद्यार्थ्यांच्या निलंबनाने या समस्येवर तोडगा निघू शकत नाही त्यामुळे पालकांसोबत बैठका घेतल्या.
बंगळुरू - कर्नाटकच्या बंगळुरू येथे विद्यार्थी लपून मोबाईल शाळेत आणत असल्याची तक्रार मिळाली. या तक्रारीने शाळा प्रशासनाने सर्व मुलांच्या बॅग तपासण्याची मोहीम आखली. परंतु या बॅग तपासताना विद्यार्थ्यांच्या बॅगेतून अशा गोष्टी बाहेर पडल्या ज्या पाहून शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे पालकही हैराण झाले.
शाळेने ८ ते १० वीच्या मुलांच्या बॅगा तपासल्या होत्या. या बॅगेत कंडोम, गर्भनिरोधक, लाईटर, सिगारेट, व्हाइटनरसारख्या गोष्टी आढळल्या. कर्नाटकात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षण मंडळाने शाळकरी मुलांच्या बॅगा तपासण्यास सांगितले. ज्यातून या प्रकाराचा खुलासा झाला. याबाबत काही शाळांनी आता पालक आणि शिक्षकांची बैठक बोलावली आहे. तर पालकांनी त्यांच्या मुलांशी संवाद साधावा अशा सूचना काही शाळांनी दिल्या आहेत.
डेक्कन हेराल्ड रिपोर्टनुसार, या संपूर्ण प्रकारानंतर शाळांनी विद्यार्थ्यांच्या निलंबनाने या समस्येवर तोडगा निघू शकत नाही त्यामुळे पालकांसोबत बैठका घेतल्या. एका प्राध्यापकांनी म्हटलं की, जेव्हा मुलांच्या बॅगेत अशाप्रकारे वस्तू सापडल्या तेव्हा त्यांचे आईवडील आणि आम्हीही हैराण झालो. विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीत त्यांना सांभाळण्याचा आम्ही विचार केला. शाळांना पालकांना नोटीस काढली. परंतु या नोटीस आधीपेक्षा खूप वेगळ्या होत्या. त्यात विद्यार्थ्यांच्या निलंबनाऐवजी त्यांच्याशी संवाद साधण्याचा सल्ला देण्यात आला होता असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थी पालकांशी बोललो त्यांना १० दिवस सुट्टी घ्यायला सांगितली असंही मुख्याध्यापक म्हणाले. तर दुसऱ्या प्रकरणात १० वी शिकणाऱ्या मुलीच्या बॅगेत कंडोम सापडलं. जेव्हा तिला याबाबत विचारलं तेव्हा तिने सांगितले की, ज्याठिकाणी ती ट्यूशनला जाते त्याठिकाणचे लोक त्यासाठी दोषी आहेत. शिक्षण मंडळाचे महासचिव डी. शशी कुमार यांनी जवळपास ८० शाळांमध्ये तपासणी केली. एका विद्यार्थ्याच्या बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या, त्याचसोबत पाण्याच्या बॉटलमध्ये दारू आढळली.
विद्यार्थी ज्या समस्येतून जात आहेत त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आई वडिलांनी मुलांकडे लक्ष द्यावं. एका प्रकरणात १४ वर्षाच्या मुलाच्या बुटातून कंडोम काढलं. काही मुले अशाप्रकारे प्रयोग करतात. त्यात धूम्रपान, ड्रग्सचा, लैंगिक सुख यांचा समावेश असतात. आई वडिलांनी मुलांसोबत चर्चा करायला हवी त्यांच्याशी बोलायला हवं असं मानसोपचातज्ज्ञ डॉ. ए जगदीश यांनी म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"