इथे माणुसकी हरली! काळी जादू करत असल्याच्या संशयावरून जोडप्याला झाडाला लटकवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 08:09 PM2023-06-19T20:09:19+5:302023-06-19T20:09:40+5:30

सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 In Kolkuru village of Sangareddy, Tamil Nadu, a couple was hanged from a tree on suspicion of practicing black magic, watch video  | इथे माणुसकी हरली! काळी जादू करत असल्याच्या संशयावरून जोडप्याला झाडाला लटकवले

इथे माणुसकी हरली! काळी जादू करत असल्याच्या संशयावरून जोडप्याला झाडाला लटकवले

googlenewsNext

हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना केली जाऊ शकत नाही. सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरं तर 'तंत्र-मंत्र आणि काळी जादू' करत असल्याच्या संशयावरून स्थानिक लोकांनी एका जोडप्याशी जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. तामिळनाडूतील संगारेड्डी येथील कोलकुरू गावात यादैय्या आणि श्यामला नावाच्या पती-पत्नीला काही ग्रामस्थांनी तंत्र-मंत्र आणि काळी जादू केल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांना झाडाला बांधून ठेवले. 

दरम्यान, ही घटना सदाशिवपेठ पोलीस स्टेशन परिसरातील कोलकुरू गावातील आहे. पोलिसांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी पीडित यादैय्या आणि त्यांची पत्नी श्यामला यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर गावकऱ्यांचा एक गट त्यांच्या घरात घुसला आणि त्यांना बळजबरीने बाहेर आणले. यादरम्यान गावकऱ्यांनी त्यांना मारहाण करून झाडाला लकवले.

याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच तात्काळ पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दाम्पत्याची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने पीडितांना गंभीर दुखापत झाली नसून घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, यादैया हे प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवरून सर्वांशी भांडायचे आणि तंत्र-मंत्राचा धाक दाखवायचे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर ते जादूटोणा करून लोकांना मारण्याची भीती दाखवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

Web Title:  In Kolkuru village of Sangareddy, Tamil Nadu, a couple was hanged from a tree on suspicion of practicing black magic, watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.