तीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी, ज्या ठिकाणी जीवदान मिळालं; त्याच ठिकाणी, त्याच तारखेला मृत्यूनं गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 01:41 PM2022-04-26T13:41:06+5:302022-04-26T13:43:08+5:30

अवघ्या ५ सेकंदांत होत्याचं नव्हतं; अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

in madhya pradesh MAN DIED ON SAME DATE ON SAME HIGHWAY WHERE HE DITCHED DEATH 3 YEARS AGO | तीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी, ज्या ठिकाणी जीवदान मिळालं; त्याच ठिकाणी, त्याच तारखेला मृत्यूनं गाठलं

तीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी, ज्या ठिकाणी जीवदान मिळालं; त्याच ठिकाणी, त्याच तारखेला मृत्यूनं गाठलं

Next

उज्जैन: मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातल्या नागदामध्ये २२ एप्रिलला एक हृदयद्रावक घटना घडली. राज्य महामार्गावर एका व्यक्तीला ट्रकनं चिरडलं. याच महामार्गावर तीन वर्षांपूर्वी व्यक्तीचा अपघात झाला होता. मात्र त्यावेळी त्याचा जीव वाचला. मात्र तीन वर्षांनंतर त्याच दिवशी, त्याच ठिकाणी त्याला मृत्यूनं गाठलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. 

केशव त्याचा मित्र राहुलसह दुचाकीवरून जात होता. मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीला अपघात झाला. एका ट्रकनं दुचाकीला धडक दिली. केशवचा जागीच मृत्यू झाला. तर राहुलवर उपचार सुरू आहेत.  पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. ट्रक एका ढाब्यावर उभा करून चालक फरार झाला आहे. 

केशवचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. संपूर्ण घटना २२ एप्रिलला रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी घडली. नागदा-जावरा राज्य महामार्गावर ट्रकनं दुचाकीला धडक दिली. केशव आणि राहुल दुचाकीवरून फिरायला निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली.

अपघात झाल्यानंतर दोन दिवसांनी घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. अवघ्या ५ सेकंदांत केशवचा मृत्यू झाल्याचं त्यात दिसत आहे. केशव एका दुकानात सेल्समन म्हणून काम करायचा. २२ एप्रिलला तो दुकानातून लवकर निघाला. तीन वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला केशवचा अपघात झाला होता. त्यातून त्याचा जीव वाचला. मात्र तीन वर्षांनी त्याला मृत्यूनं गाठलं.

Web Title: in madhya pradesh MAN DIED ON SAME DATE ON SAME HIGHWAY WHERE HE DITCHED DEATH 3 YEARS AGO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.