पतीने आई आणि बहिणीचा नंबर ब्लॉक केला तरच सोबत राहणार; पत्नीची अनोखी अट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 02:40 PM2023-01-17T14:40:04+5:302023-01-17T14:40:38+5:30
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका केंद्रात समुपदेशन केल्यानंतर पती-पत्नी एकत्र राहण्यास तयार झाले आहेत. समुपदेशनामध्ये संबंधित महिलेने म्हटले की, पतीची बहीण आणि आई आमच्या घरात भांडणाचे कारण आहे. म्हणून पत्नीने पतीला त्याची आई आणि बहिणीचा मोबाईल नंबर ब्लॉक करण्यास सांगितले. यावर पतीने दोघांचे नंबर ब्लॉक केले. यानंतर महिलेने पतीसोबत राहण्यास होकार दिला.
पतीने आई आणि बहिणीचे नंबर ब्लॉक केल्यावर पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास होकार दिला. खरं तर पती चार महिने बहिणीच्या घरीही जाणार नाही असे ठरवण्यात आले आहे. समुपदेशन केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. यानंतर महिला पतीसोबत निघून गेली. खरं तर माझोला येथील करुला येथे राहणाऱ्या एका महिलेने एसएसपी कार्यालयात अर्ज दिला होता. ज्यात तिने सांगितले की, आठ वर्षांपूर्वी तिचे लग्न फर्ममध्ये काम करणाऱ्या तरुणाशी झाले होते. पती-पत्नी मुलांसह भाड्याच्या घरात राहतात. मात्र, पती त्याची बहीण आणि आईच्या सांगण्यावरून तिला मारहाण करायचा.
पतीने आई आणि बहिणीचा नंबर केला ब्लॉक
जेव्हा मी घरखर्चासाठी पैसे मागते तेव्हा पती घर सोडून बहिणीच्या घरी जातो असे पत्नीने सांगितले. पतीने वागणूक न बदलल्यास घटस्फोट द्यावा, अशी मागणीही महिलेने केली होती. महिलेचे प्रार्थनापत्र संबंधित केंद्रात पाठवण्यात आले. येथे दोन्ही पक्षांमध्ये समुपदेशन करण्यात आले, ज्यात महिलेने सांगितले की, "आमच्या घरात भांडणाचे कारण पतीची बहीण आणि आई आहे. जर पती त्यांच्या संपर्कात राहिला तर मी त्याच्याबरोबर राहणार नाही." यावर आई व बहिणीशी संपर्क करणार नसल्याचे पतीने कबुल केले. यानंतर पतीने दोघांचेही नंबर ब्लॉक केले. यानंतर महिलेने पतीसोबत राहण्यास होकार दिला. केंद्राच्या प्रभारी संदीपा चौधरी यांनी सांगितले की, समुपदेशनानंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. पती-पत्नीने एकत्र राहण्याचे मान्य केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"