ओडिशात आमदाराच्या गाडीने २२ जणांना चिरडले; जखमींमध्ये सात पोलिसांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 07:04 AM2022-03-13T07:04:53+5:302022-03-13T07:05:10+5:30

या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

In Odisha, 22 people were crushed by an MLA's car | ओडिशात आमदाराच्या गाडीने २२ जणांना चिरडले; जखमींमध्ये सात पोलिसांचा समावेश

ओडिशात आमदाराच्या गाडीने २२ जणांना चिरडले; जखमींमध्ये सात पोलिसांचा समावेश

Next

भुवनेश्वर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीच्या घटनेची पुनरावृत्ती ओडिशात झाली आहे. बिजू जनता दलाचे चिल्काचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने गर्दीतील २२ जणांना उडविल्याने एकच खळबळ माजली आहे. जखमींमध्ये सात पोलिसांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान बानापूर येथे बीडीओच्या कार्यालयाबाहेर जमा झालेल्या गर्दीतील लोकांना या कारने उडविले. यात बानापूरच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आर. आर. साहू यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेत भाजपचे १५ कार्यकर्ते आणि ७ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमी झालेेले आमदार जगदेव यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: In Odisha, 22 people were crushed by an MLA's car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात