रिव्हर्स जीवावर बेतला! पिकअपच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; भीषण अपघात CCTVमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 13:53 IST2022-02-14T13:48:52+5:302022-02-14T13:53:22+5:30
मजूर महिलेला पिकअपची धडक; चालक घटनास्थळावरून फरार

रिव्हर्स जीवावर बेतला! पिकअपच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; भीषण अपघात CCTVमध्ये कैद
भिलवाडा: राजस्थानमधील भिडवाडा येथे एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका पादचारी महिलेला पिकअपनं चिरडलं. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. पिकअपचं चाक महिलेच्या डोक्यावरून गेलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
कृषी मंडईत मजुरीचं काम करणाऱ्या कांचन देवी चहा पिण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी एक पिकअप चालक गाडी मागे घेत होता. वेगात आलेल्या पिकअपनं कांचन देवी यांना धडक दिली. धडक बसल्यावरही पिकअप थांबली नाही. गाडीचं चाक महिलेच्या डोक्यावरून गेलं. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघात होताच पिकअप चालक तिथून पळून गेला. पोलिसांनी पिकअप ताब्यात घेतली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कांचन देवी यांच्या कुटुंबीयांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. कांचन देवी कृषी मंडईत काम करायच्या. कामादरम्यान चहा पिण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.