पतीनं प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; मग विश्वास जिंकण्यासाठी 'तिनं' केलं राक्षसी कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:10 IST2023-03-03T18:09:32+5:302023-03-03T18:10:09+5:30
बिहारमधील सीतामढी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पतीनं प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; मग विश्वास जिंकण्यासाठी 'तिनं' केलं राक्षसी कृत्य
नवी दिल्ली : बिहारमधील सीतामढी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रियकरासोबत पत्नीचे अवैध संबंध पतीला समजल्यावर त्याने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला. मात्र, पतीचा विश्वास जिंकण्यालाठी पत्नीने एक कट रचला. स्वत:ला शुद्ध दाखवण्यासाठी महिलेने तिच्या प्रियकराच्या हत्येची सुपारी दिली आणि त्याला संपवले. ही धक्कादायक घटना बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील आहे.
पतीचा विश्वास जिंकण्यासाठी प्रियकराला संपवलं
दरम्यान, मोहम्मद परवेजचा गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी सीतामढी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. खरं तर विवाहित महिला अनिशा खातूनचे मोहम्मद परवेजसोबत प्रेमसंबंध होते, ज्याची माहिती मिळताच तिचा पती मोहम्मद निजामुद्दीनने तिच्या सोबत राहण्यास नकार दिला. यानंतर महिलेने पतीचा विश्वास जिंकण्यासाठी प्रियकराला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि अवैध संबंध खोटे सिद्ध करून स्वत:ला शुद्ध सिद्ध करण्यासाठी प्रियकराची हत्या केली. प्रियकराचा खून करण्यासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली. मोहम्मद परवेजची हत्या केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट किलरने त्याचा मृतदेह बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंडी राजवाडा मालाही येथे फेकून दिला.
खरं तर अनिशाचा प्रियकर मोहम्मद परवेजने दोघांच्या शारीरिक संबंधाचा व्हिडीओ देखील बनवला होता. तो नेहमी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. परवेजच्या हत्येच्या प्रकरणात स्थानिक सुरक्षारक्षक आणि मीडियातील एका व्यक्तीलाही आरोपी करण्यात आले होते, मात्र कॉन्ट्रॅक्ट किलरची चौकशी केल्यानंतर मीडियातील व्यक्ती आणि पोलीस ठाण्यात तैनात असलेला सुरक्षारक्षक दोघेही निर्दोष असल्याचे आढळून आले. सीतामढीचे एसपी हरकिशोर राय यांनी या संदर्भात सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असून याप्रकरणी परवेजची प्रेयसी आणि आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"