तेलंगणात एफएम, यूट्युबवर प्रचाराचा धडाका, तर १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:00 AM2023-11-09T11:00:50+5:302023-11-09T11:01:37+5:30
बीआरएसच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचे यातून जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत आहे. इतर पक्षांनीही प्रचारासाठी स्वतंत्र टीम गठित केल्या आहेत.
हैदराबाद : एफएम रेडिओवरील टॉक शो, तेलुगू सिनेकलाकारांच्या मुलाखती ते यूट्युब, लिंक्ड् इन, व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत सर्व माध्यमांचा भारत राष्ट्र समितीकडून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रभावी वापर सुरू आहे. बीआरएसच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचे यातून जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत आहे. इतर पक्षांनीही प्रचारासाठी स्वतंत्र टीम गठित केल्या आहेत. (वृत्तसंस्था)
प्रत्येक ठिकाणी वॉररूम
प्रत्येक मतदारसंघात बीआरएसने एक वॉररूम तयार केली आहे. ती त्या स्थानिक उमेदवाराला प्रचारात मदत करते. दर ४८ तासांनी केटीआर यांच्या मुलाखती टीव्ही चॅनेल, एफएम रेडिओवरून प्रसारित होतात.
व्हिडीओला लाखो व्ह्यू
बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यूट्यूब चॅनेलवर अनेक गोष्टी सादर करतात.
या चॅनेलचे २० लाख फॉलोअर आहेत.या व्हिडीओला २२ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
१७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार
बीआरएसने तेलंगणा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले असून त्यात १६ लाख लोक सदस्य आहे. दररोज या ग्रुपमध्ये किमान ८ संदेश पाठविले जातात. काही संदेश लिखित तर काही व्हिडीओ स्वरूपातील असतात. बीआरएसचे सदस्य नसलेल्या व तटस्थ वृत्तीच्या लोकांच्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या कामाबद्दल मुलाखती घेऊन त्या प्रसारित केल्या जातात.