दहा वर्षांत देशात विक्रमी संख्येने डॉक्टर मिळतील: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 01:12 PM2022-04-16T13:12:11+5:302022-04-16T13:12:31+5:30

देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आगामी दहा वर्षात देशात विक्रमी संख्येने नवे डॉक्टर मिळणार आहेत. 

In ten years the country will get a record number of doctors Prime Minister Modi | दहा वर्षांत देशात विक्रमी संख्येने डॉक्टर मिळतील: पंतप्रधान मोदी

दहा वर्षांत देशात विक्रमी संख्येने डॉक्टर मिळतील: पंतप्रधान मोदी

Next

नवी दिल्ली :

देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आगामी दहा वर्षात देशात विक्रमी संख्येने नवे डॉक्टर मिळणार आहेत. 

पंतप्रधान मोदी यांनी भूज येथील २०० बेडचे के.के. पटेल धर्मदाय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल शुक्रवारी देशाला समर्पित केले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना मोदी म्हणाले की, कोरोनाचा धोका कायम आहे. लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. एखाद्याला गरिबाला जेव्हा स्वस्त आणि उत्तम उपचार मिळतात तेव्हा त्याचा व्यवस्थेवरचा विश्वास मजबूत होतो. 

ते म्हणाले की, दोन दशकांपूर्वी गुजरातमध्ये केवळ नऊ वैद्यकीय महाविद्यालये होती. यात जवळपास ११०० जागा होत्या. मात्र, गत २० वर्षात व्यापक बदल झाले आहेत. आता राज्यात एक एम्स आहे आणि तीन डझनपेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत. 

हॉस्पिटलमध्ये असतील या सेवा...
या हॉस्पिटलची निर्मिती भूजच्या श्री कच्छी लेवा पटेल समाजाकडून करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये कार्डियोलॉजी, कार्डियोथोरेसिक सर्जरी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, न्यूक्लियर मेडिसिन, न्यूरो सर्जरी, ज्वाइंट रिप्लेसमेंट आणि अन्य सहायक सेवा उपलब्ध असणार आहेत. 

Web Title: In ten years the country will get a record number of doctors Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.