अख्खा चीन टप्प्यात, डिवचल्यास होणार करेक्ट कार्यक्रम, भारताकडून अग्नी-४ क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:02 PM2022-06-06T23:02:03+5:302022-06-06T23:09:19+5:30
Agni-4 Missile: भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये मोठं यश मिळवलं आहे. सोमवारी ओदिशामधील एपीजे अब्दुल कलाम द्विपवरून मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-४ ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी देशाच्या लष्करी क्षमतेमधील उल्लेखनीय वाढीचं प्रतीक आहे.
नवी दिल्ली - भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये मोठं यश मिळवलं आहे. सोमवारी ओदिशामधील एपीजे अब्दुल कलाम द्विपवरून मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-४ ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी देशाच्या लष्करी क्षमतेमधील उल्लेखनीय वाढीचं प्रतीक आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या संक्षिप्त माहितीमध्ये सांगितले की, ही चाचणी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये सांगण्यात आले की, अग्नी-४ ची यशस्वी चाचणी भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिबंधात्मक क्षमतेच्या नीतीला दुजोरा देते.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, मध्यम रेंजचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-४ ची यशस्वी चाचणी सोमवारी संध्याकाळी सुमारे साडे सातच्या सुमारास एपीजे अब्दुल कलाम द्वीप, ओदिशा येथे करण्यात आली.
मंत्रालयाने सांगितले की या चाचणीने सर्व परिचालन मापदंडांसह प्रणालीच्या विश्वसनीयतेलाही सिद्ध केले. ही यशस्वी चाचणी विश्वसनीय किमान प्रतिरोध क्षमता ठेवण्याच्या भारताच्या धोरणाला दुजोरा देते.
अग्नी-४ क्षेपणास्त्रामुळे भारतीय सैन्यदलाला अजून बळ मिळणार आहे. या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं एकूण वजन १७ हजार किमी आहे. तसेच त्याची एकूण रेंज ही २० मीटरपर्यंत आहे. आग्नी-४ आपल्यासोबत आण्विक हत्यारे घेऊन जाण्यास सक्षम आहे. तसेच ते ९०० किमीपर्यंत उड्डाण करू शकते.