'मंत्र्यांसोबत यमुना नदीत...'; योगी आदित्यनाथांचं अरविंद केजरीवालांना मोठं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:56 IST2025-01-23T16:55:52+5:302025-01-23T16:56:29+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंत्र्यांसोबत यमुना नदीत स्नान करण्याचे आव्हान दिले आहे.

'मंत्र्यांसोबत यमुना नदीत...'; योगी आदित्यनाथांचं अरविंद केजरीवालांना मोठं चॅलेंज
Delhi Election 2025 Yogi Adityanath: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थेट आव्हान दिले. एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी यमुना नदीत प्रदूषणावरून केजरीवालांना लक्ष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
योगी आदित्यनाथ म्हणाले, "काल (२२ जानेवारी) मी माझ्या सर्व ५५ मंत्र्यांसह प्रयागराजमधील संगमावर एकत्र स्नान केले आणि पुण्य मिळवले. आम्ही नशिबवान आहोत की, महाकुंभामध्ये देश-विदेशातून येत असलेल्या भाविकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली."
'नैतिक धाडस असेल, तर केजरीवालांनी उत्तर द्यायला हवं'
"मुख्यमंत्री म्हणून मी आणि माझे मंत्री प्रयागराजमधील संगमावर स्नान करू शकतो, तर मी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना विचारू इच्छितो की, तुम्ही तुमच्या मंत्र्यांसह यमुना नदीत स्नान करू शकता का? जर त्यांच्यात नैतिक धाडस असेल, तर त्यांनी याचं उत्तर द्यायला हवं", असं केजरीवाल यावेळी म्हणाले.
एनडीएमसी क्षेत्र सोडले तर उर्वरित दिल्लीत रस्ते, गटारं आणि पाण्याच्या पाण्याची काय स्थिती आहे. आजपासून एका दशकापूर्वी लोक दिल्लीत सुविधा मिळवण्यासाठी आणि दिल्ली बघण्यासाठी यायचे. आता रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ते हेही कळत नाही", अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी आप सरकारवर केली.