उत्तर प्रदेशात दर दोन तासाला अपघातात ५ लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:31 AM2022-05-24T07:31:47+5:302022-05-24T07:32:12+5:30
गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत.
राजेंद्र कुमार
लखनौ : उत्तर प्रदेशात दर दोन तासाला रस्त्यावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू होत आहे. यातील ७० टक्के मृत्यूचे कारण डोक्याला झालेली दुखापत हे आहे. तर, ३० टक्के मृत्यूमध्ये अपघातातील अन्य कारण आहे.
गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत. यात २१,२२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, वाहनातील १९,४०२ लोक जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा विभागाने तयार केलेली ही आकडेवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी अतिक्रमणाविरुद्ध मोहीम चालविण्याचे निर्देश दिले आहेत.
अतिक्रमणांमुळे अपघात
अतिक्रमणांमुळे रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे. अतिजड वाहनांमुळे रस्ते खराब होतात. हे सर्व अवैध टॅक्सी स्टँड, बस स्टँड आणि ट्रक स्टँड चालविणाऱ्या ठेकेदारांमुळे नुकसान होत आहे. अशा लोकांवर विनाविलंब कठोर कारवाई करण्याचे निर्देशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.