ऐकावं ते नवलच! पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने परत घेतलं 'तेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 03:10 PM2023-05-23T15:10:18+5:302023-05-23T15:11:00+5:30
2000 note exchange : आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारपासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
लखनौ : आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवार पासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २००० नोटा बदलण्यावरून लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केले आहे. मात्र, २ हजाराच्या नोटेवरून काही लोकांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे, ज्याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात पाहायला मिळाला. इथे पेट्रोल भरायला आलेल्या व्यक्तीने गाडीत पेट्रोल भरल्यानंतर २ हजाराची नोट काढली अन् पंपावरील कर्मचाऱ्याने जे काही केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.
ग्राहकाने २ हजार रूपयांची नोट दिल्याने कर्मचाऱ्याने ती घेण्यास नकार दिला. खरं तर ग्राहकाने दुसरी नोट देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पंप कर्मचाऱ्याने त्याच्या गाडीत भरलेले पेट्रोल माघारी घेतले. सध्या या अनोख्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यूपी के जालौन में पेट्रोल पंप पर 2000 का नोट दिया
— Nigar Parveen (@NigarNawab) May 22, 2023
कर्मचारियों ने नोट लेने से मना कर दिया। बाद में डाला पेट्रोल भी टंकी से निकाल लिया
वीडियो सोशल मीडिया पर हुआ वायरल pic.twitter.com/mpuvb2usEd
मंगळवारपासून नोटा बदलता येणार
लोकांकडे नोटा बदलण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी आहे, असं आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. बाजारात दुसऱ्या नोटांची कमतरता नाही. आरबीआय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. आवश्यक सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २ हजाराची नोट पुन्हा घेण्याचे ठरवले आहे. सध्या बाजारात असलेल्या २ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकिंग सिस्टममध्ये येण्याची शक्यता आहे. करन्सी मॅनेटमेंट प्रक्रियेचा भाग म्हणून २ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. २ हजाराच्या नोटा लीगल टेंडर राहतील असंही आरबीआयने म्हटलं आहे.