संतापजनक! बेवड्याने कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून मीठ लावून खाल्ले; गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 07:23 PM2022-12-14T19:23:10+5:302022-12-14T19:23:38+5:30

उत्तर प्रदेशातील बरेली येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

In Uttar Pradesh's Bareilly, a drunk man cut off the ears and tail of a puppy and ate it   | संतापजनक! बेवड्याने कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून मीठ लावून खाल्ले; गुन्हा दाखल 

संतापजनक! बेवड्याने कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून मीठ लावून खाल्ले; गुन्हा दाखल 

googlenewsNext

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बरेली येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका बेवड्याने दोन कुत्र्यांच्या पिल्लांचे कान आणि शेपटी कापली आणि मीठ लावून दारूसोबत खाल्ली. कुत्र्याच्या एका पिल्लाचा कान कापला गेला तर दुसऱ्या पिल्लाची शेपटी कापली गेली. ही धक्कादायक घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ माजली. जखमी पिल्लांवर उपचार सुरू आहेत मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रक्ताच्या थारोळ्यात लहान पिल्लं 
खरं तर फरीदपूर पोलीस स्टेशन परिसरातील एसडीएम कॉलनीत ही घटना घडली आहे, जिथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने कुत्र्याच्या पिल्लांचा कान आणि शेपटी कापून दारूसोबत चकणा म्हणून खाल्ली. मुकेश वाल्मिकी आणि आणखी एका व्यक्तीने एकत्र बसून दारू पिऊन दोन पिल्लांशी ही अमानुष वागणूक दिली असे सांगितले जात आहे. यानंतर पीपल फॉर निमल संस्थेचे सदस्य धीरज पाठक यांच्या वतीने फरीदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SSP यांनी दिले चौकशीचे आदेश 
पिल्लांसोबतच्या या अमानुष आणि घृणास्पद कृत्याची माहिती एसएसपी अखिलेश चौरसिया यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. यासोबतच आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: In Uttar Pradesh's Bareilly, a drunk man cut off the ears and tail of a puppy and ate it  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.