इंस्टाग्रामवरून जडलं प्रेम! 2 वर्षे लग्नाच्या बहाण्याने केलं शोषण; मग आंगलट आल्यावर पलटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 04:30 PM2023-03-17T16:30:55+5:302023-03-17T16:31:37+5:30

उत्तर प्रदेशातील दौसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

In Uttar Pradesh's Dausa, a young man sexually abused a minor girl on the pretext of marriage | इंस्टाग्रामवरून जडलं प्रेम! 2 वर्षे लग्नाच्या बहाण्याने केलं शोषण; मग आंगलट आल्यावर पलटला

इंस्टाग्रामवरून जडलं प्रेम! 2 वर्षे लग्नाच्या बहाण्याने केलं शोषण; मग आंगलट आल्यावर पलटला

googlenewsNext

दौसा : उत्तर प्रदेशातील दौसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने एकच खळबळ माजली. आरोपी तरूणाने अल्पवयीन पीडितेशी इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी बोलावले. पीडित मुलगी बांदिकुई येथे पोहोचताच आरोपीने तिला पंडितपुरा या गावात नेले आणि तेथील एका घरात तिच्यावर बलात्कार केला.

खरं तर ही घटना नोव्हेंबर 2022 ची आहे, पण आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण केले. मात्र आरोपीने लग्नास नकार दिल्याने आता पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह बसवा पोलीस ठाणे गाठून आरोपी सोनू मीना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल 
पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पीडितेचे मेडिकलही. पोलिसांनी पीडितेचा जबाबही नोंदवला आहे. सध्या पोलिसांचे पथक आरोपी सोनू मीना याचा शोध घेत आहेत. बसवा पोलीस स्टेशनचे अधिकारी रामनिवास मीना यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी सोनू मीना हा पीडित तरुणीच्या जवळपास 2 वर्षांपासून संपर्कात होता आणि तो इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संवाद साधायचा. इंस्टाग्रामवर चॅटिंग करत आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर पंडितपुरा गावात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: In Uttar Pradesh's Dausa, a young man sexually abused a minor girl on the pretext of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.