कोणत्या कंपन्यांमध्ये वाढले लैंगिक शोषण? २०२३ मध्ये ३१ % वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 01:19 PM2023-09-25T13:19:38+5:302023-09-25T13:20:11+5:30
वित्त वर्ष २०२३ मध्ये लैंगिक शोषणाच्या घटनांत ३१ टक्के वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : नोकरदार महिलांच्या लैंगिक शोषणात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून ५० टक्क्यांपेक्षाही अधिक महिला लैंगिक शोषणापासून वाचण्यात अपयशी ठरतात, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. ‘कम्प्लायकारो डॉट काॅम’ने जारी केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या ५०० कंपन्यांपैकी ३७० कंपन्यांत २०२२ च्या तुलनेत वित्त वर्ष २०२३ मध्ये लैंगिक शोषणाच्या घटनांत ३१ टक्के वाढ झाली आहे.
आतापर्यंत ७० लाख तक्रारी
nमहिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात २०२२ पर्यंत नोकरीच्या स्थळी लैंगिक शोषण झाल्याच्या ७० लाख तक्रारी प्राप्त झाल्या.
nसर्वाधिक तक्रारी दिल्ली (११.२ लाख), पंजाब (१०.५ लाख) आणि गुजरात (१०.४ लाख) या राज्यांतून आल्या.
nदिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या शहरांत सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या.
जगात ३८ टक्के महिलांचे शोषण
जगभरात ३८ टक्के महिलांचे कामाच्या स्थळी लैंगिक शोषण होते. १४१ देशांत त्याविरुद्ध कायदे आहेत. मात्र, ५८ टक्के महिला तक्रार करण्याचे धाडस करीत नाहीत.
कधी ना कधी झाले शोषण
बहुतांश महिलांनी सांगितले की, त्यांना कधी ना कधी लैंगिक शोषणास सामोरे जावे लागले. ५१% महिलांनी लज्जेस्तव तक्रार टाळली.
काय म्हणतो कायदा?
कार्यस्थळावरील लैंगिक शोषणाविरोधात देशात ‘लैंगिक शोषण (प्रतिबंध, निषेध व निवारण) अधिनियम-२०१३’ हा कायदा करण्यात आला. त्यानुसार, महिलेच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करणे, भीती अथवा प्रलोभन दाखवून शारीरिक संबंधांची मागणी करणे, अश्लील बोलणे व अश्लील चित्र अथवा व्हिडीओ दाखविणे गुन्हा आहे.
५००
कंपन्यांपैकी ३७० कंपन्यांत लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत वाढ
६५%
कंपन्यांपैकी ३७० कंपन्यांत लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत वाढ
५१%
महिला तक्रार करण्याची हिंमत करीत नाहीत