कुळधरणला भरतो असुविधांचा बाजार ओटे, पिण्याचे पाणी, पार्किंग सुविधांचा अभाव
By admin | Published: April 4, 2015 01:54 AM2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरणच्या आठवडे बाजारात ग्रामपंचायतकडून विक्रेते तसेच बाजारकरुंसाठी सुविधाच पुरविल्या जात नाहीत. तालुक्याच्या विविध भागातून येणार्या ग्राहकांची गैरसोय होत असून, विक्रेते असुविधेमुळे त्रस्त आहेत.
Next
क ळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरणच्या आठवडे बाजारात ग्रामपंचायतकडून विक्रेते तसेच बाजारकरुंसाठी सुविधाच पुरविल्या जात नाहीत. तालुक्याच्या विविध भागातून येणार्या ग्राहकांची गैरसोय होत असून, विक्रेते असुविधेमुळे त्रस्त आहेत.तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कुळधरण येथील शुक्रवारच्या आठवडे बाजारातील गैरसोयीने विक्रेत्यांमध्ये असंतोष आहे. बाजारात ओट्यांचे बांधकाम झाले नसल्याने विक्रेत्यांना जमिनीवरच बसावे लागते. जमिनीवरच दुकाने थाटल्याने मोकाट जनावरांना आवरताना मोठी कसरत होते. ग्राहकांच्या पायाची धूळ विक्रीच्या मालात जात असल्याने मालाचे नुकसान होते. तंबाखू, खाद्य तेल विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसतो.बाजारात ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्याची कसलीच व्यवस्था केली जात नसल्याने विक्रेते व ग्राहकांना लाचारी पत्करत पाणी मागत फिरावे लागते. त्यामुळे बाहेरगावच्या नागरिकांची हेळसांड होते. पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने विक्रेत्यांची मालवाहतूक करणारी वाहने अस्ताव्यस्तपणे बाजार परिसरात लावली जातात. अनेक वाहने जगदंबा मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत लावली जात असल्याने भाविकांची मंदिरात जाण्यासाठी कसरत होते. पार्किंगअभावी वाहने कोठेही उभी करावी लागत असल्याने वाहनांच्या इंधनाची चोरी, हवा सोडून देणे, असे प्रकार वाढले आहेत. गेल्या महिन्यात ---- ----- --- ---- चोरीस गेल्याने विक्रेते चिंतेत ----- ----जगदंबा मंदिरालगत मारुती मंदिराभोवती बाजार भरत असून, परिसरात वृक्ष लागवड केली नसल्याने उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. सुविधा न पुरवता ग्रामपंचायतीकडून भरमसाठ कर वसुली केली जाते. कुळधरणसह, सुपेकरवाडी, पिंपळवाडी, धालवडी, राक्षसवाडी, कोपर्डी, हिवरवाडी आदी भागातील शेतकरी शेतातील माल, पालेभाज्या विक्रीस आणतात; तसेच राशीन, मिरजगाव, कर्जत तसेच करमाळा तालुक्यातून अनेक विक्रेते येथे बाजारात विक्री करण्यासाठी येतात. मात्र सुविधाच मिळत नसल्याने विक्रेते तसेच बाजारकरु वैतागून गेले आहेत.नियोजनाचा अभावअनेक विक्रेते बाजारतळ सोडून मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत तसेच वडाच्या झाडाखाली बसतात. आईस्क्रीम, अंडे, घड्याळ विक्रेते तसेच चर्मकार रस्त्यावरच दुकाने थाटत असल्याने ग्राहकांना बाजारापर्यंत पोहोचनेही कठीण जाते. मंगल कार्यालयासमोरच्या मोकळ्या जागेत पार्किंग करणे सहज शक्य असतानाही नियोजनाच्या अभावाचा फटका नागरिकांना बसतो.(अपूर्ण.....)