अपुऱ्या पावसाचा खरिपाला फटका

By Admin | Published: August 17, 2015 11:36 PM2015-08-17T23:36:07+5:302015-08-17T23:36:07+5:30

हिमाचलच्या पायथ्याशी असलेल्या भागात पुराचा इशारा देण्यात आला असला तरी अनेक भागात अपुऱ्या पावसाचा फटका बसला आहे. येत्या काही काळात

Inadequate rain losses | अपुऱ्या पावसाचा खरिपाला फटका

अपुऱ्या पावसाचा खरिपाला फटका

googlenewsNext

नवी दिल्ली : हिमाचलच्या पायथ्याशी असलेल्या भागात पुराचा इशारा देण्यात आला असला तरी अनेक भागात अपुऱ्या पावसाचा फटका बसला आहे. येत्या काही काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात खरीप पिकांची स्थिती आणखी बिकट बनेल असा दावा हवामान खात्याने केला आहे.
सध्या देशभरात १० टक्के अपुरा पाऊस आहे. येत्या दोन महिन्यांत म्हणजे आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये ही टंचाई १६ टक्क्यांच्या घरात जाईल. या हंगामाच्या अखेरीस अपुऱ्या पावसाचे प्रमाण १२ टक्क्यांवर जाऊ शकते, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड यांनी सांगितले.
येत्या तीन- चार दिवसांत बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी त्यानंतर संपूर्ण काळ कोरडा राहू शकतो. देशाच्या काही भागात पावसाची टंचाई वाढणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Inadequate rain losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.