बालगंधर्व संगीत महोत्सवाचे थाटात उद्घाटन
By Admin | Published: January 6, 2017 02:13 AM2017-01-06T02:13:02+5:302017-01-06T02:13:02+5:30
जळगाव : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपाला आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवास ५ जानेवारी रोजी थाटात प्रारंभ झाला. प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.
ज गाव : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपाला आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवास ५ जानेवारी रोजी थाटात प्रारंभ झाला. प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास भवरलाल व कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका ज्योती जैन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक उदय पानसे, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विनायक टेंभुर्णे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पु.ग. अभ्यंकर, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. आजचे प्रमुख कलाकार पंडित तुळशीदास बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बोरकर व त्यांचा शिष्य उन्मेश खैरे यांनी संवादिनी वादन सादर करून रसिकांची मने जिंकली. ५ ते ८ जानेवारी असे चार दिवस या महोत्सवात जळगावकर रसिकांना सुरेल संगीताची मेजवानी मिळणार आहे.