केवडियासाठी आठ नव्या रेल्वेगाड्यांचे उद्घाटन, पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 03:07 AM2021-01-18T03:07:52+5:302021-01-18T03:08:08+5:30
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या नव्या ८ गाड्यांमुळे केवडिया परिसरातील आदिवासींच्या विकासालाही चालना मिळेल. पर्यटकांची संख्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे एक लाखांनी वाढेल.
अहमदाबाद : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने ओळखला जाणारा जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरातमधील केवडिया येथे आहे. तेथून देशातील विविध भागांमध्ये जाणाऱ्या आठ नव्या रेल्वेगाड्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रविवारी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या नव्या ८ गाड्यांमुळे केवडिया परिसरातील आदिवासींच्या विकासालाही चालना मिळेल. पर्यटकांची संख्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे एक लाखांनी वाढेल.
ही ठिकाणे जोडणार
अहमदाबाद-केवडिया मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोन टुरिस्ट कोच लावलेले आहेत. या डब्यात छताला तसेच सर्व आसनांच्या बाजूने काचा लावण्यात आल्या आहेत. गुजरातमधील केवडियाहून अहमदाबाद, मुंबईतील दादर, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानक, उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्य प्रदेशातील रेवा, चेन्नई, वडोदरा येथील प्रतापनगर, तमिळनाडूतील एम. जी. रामचंद्रन रेल्वेस्थानक या ठिकाणी आठ नव्या रेल्वेगाड्या जातील.