देऊळगावगाडा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन
By admin | Published: December 21, 2015 12:01 AM2015-12-21T00:01:52+5:302015-12-21T00:01:52+5:30
खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नीत वरवंड येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या स्वच्छ व स्वस्थ भारत अभियानातंर्गत हिवाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Next
ख र : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नीत वरवंड येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या स्वच्छ व स्वस्थ भारत अभियानातंर्गत हिवाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार रंजना कुल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री दिवेकर, पंचायत समितीच्या उपसभापती आशा डेंबळकर, साहेबराव वाबळे, अंकुश दिवेकर, डी.डी. बारवकर, सरपंच ज्योती जामकर, उपसरपंच संगीता शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शितोळे उपस्थित होते. शुक्रवार दि. १८ डिसेंबर ते २४ डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या या राष्ट्रीय योजनेच्या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देऊळगावगाडा परिसर, नारायणमहाराज बेट परिसरातील साफसफाई, रस्त्यांच्या लगत असलेली काटेरी झुडपांची छटाई, गाव ओढ्यावर वनराई बंधारे, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती अशा प्रकारची कामे या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. प्राणायम, इतिहासलेखन, सर्वेक्षण, शरीरस्वच्छता, पथनाट्ये, प्रभातफेरी हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थी आरोग्य शिबिर, पशुचिकित्सा शिबिर, सेंद्रिय खते, महिला सबलीकरण या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमादरम्यान आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती रोहिणी पवार, विकास ताकवणे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गौतम बोलखेडे, के.डी. वणवे हे कार्यक्रमास सदिच्छा भेट देणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन नानासाहेब गोफणे, डॉ. विनोद काकडे, संगीता साळवे, डॉ. किरण जाधव, माऊली कोकाटे, जयश्री चव्हाण यांनी केले आहे.फोटोओळ : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिर आयोजनाप्रसंगी माजी आमदार रंजना कुल यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. लक्ष्मण शितोळे.20122015-िं४ल्लि-03---------------