अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण, मोदींनी सांगितलं रामभक्तीचं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 02:03 PM2022-09-28T14:03:52+5:302022-09-28T14:15:37+5:30

लती मंगेशकर यांच्या जयंतीदिनी अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

Inauguration of Lata Mangeshkar Chowk in Ayodhya, PM Modi said an example of Rambhakti | अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण, मोदींनी सांगितलं रामभक्तीचं उदाहरण

अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण, मोदींनी सांगितलं रामभक्तीचं उदाहरण

Next

नवी दिल्ली -  स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती असून विविध क्षेत्रातून लतादिदींच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे संबंध खूप घनिष्ट होते. लतादिदींच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी पत्र लिहून त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लता दीदींच्या आठवणी जागवत अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे हा चौक अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि शरयू नदीपासून अगदी जवळ आहे. 

लती मंगेशकर यांच्या जयंतीदिनी अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. दीदी गेल्यापासून मी फारसं त्यांच्याबद्दल कुठे बोललो नाही, सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही असं राज ठाकरे म्हणाले. तर, बॉलिवूडमधील कलाकारांनीही लता दीदींच्या आठवणी जागवत विनम्र अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ शेअर करत लता दीदींच्या स्मृती जागवल्या आहेत. तसेच, लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण केल्याचेही सांगितले. अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून नजीकच हा चौक आहे. त्यामुळे, लता दीदींच्या नावाने समर्पित करायाला या जागेशिवाय दुसरं काही चांगलं असणार, असेही मोदींनी म्हटले. 


प्रभू श्रीरामांच्या अगोदर त्यांचे भक्त पोहोचतात. त्यामुळेच, राम मंदिर बनण्यापूर्वी प्रभू श्रीरामांच्या भक्त असलेल्या लता दीदींच्या नावाने चौक बनविण्यात आला आहे. अयोध्येतील हे राम मंदिर विकासकामाचं मोठं उदाहरण आहे, असेही मोदींनी म्हटले. ज्याप्रमाणे अयोध्येने आपल्या मनात राम वसवला, त्याचप्रमाणे लता दीदींच्या भजनांमुळे आपल्या मनात प्रभू श्रीराम वसले आहेत. लता दीदी या देवी सरस्वतीच्या उपासक होत्या, असेही मोदींनी यावेळी सांगितले.  

Web Title: Inauguration of Lata Mangeshkar Chowk in Ayodhya, PM Modi said an example of Rambhakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.