१८० किमी वेगाने धावणार रॅपिड रेल्वे, ‘नमो भारत’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 05:49 AM2023-10-21T05:49:52+5:302023-10-21T05:50:07+5:30
पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट प्रणालीची सुरुवात
नवी दिल्ली : दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरमध्ये ताशी १८० किमी वेगाने धावणाऱ्या रॅपिड रेल्वे ‘नमो भारत’च्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवून तसेच त्यात प्रवास करून लोकार्पण केले. देशातील या पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट प्रणालीची भविष्यात राजधानी दिल्ली परिसरात अन्य सात कॉरिडॉरमध्ये पुनरावृत्ती होणार आहे.
ही तर केवळ सुरुवात
संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. नमो भारत ही भविष्यातील भारताची झलक आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थान अशी अनेक राज्ये नमो भारत रेल्वेने जोडली जाणार आहेत.
काय असतील नमो भारत रेल्वेत सुविधा?
राजधानी रेल्वेप्रमाणे आरामदायी रिक्लाइनर खुर्च्या, फूटरेस्ट, बाटली किंवा कप ठेवण्यासाठी होल्डर, कोट टांगण्यासाठी हूक, उजेड आणि उन्हापासून त्रास होत असल्यास ब्लाइंडर्स या सुविधांनी युक्त भारताची पहिली रॅपिड रेल्वे ठरली आहे.