बेळगाव येथे कर्नाटक केसरी,स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन

By वसंत भोसले | Updated: December 26, 2024 19:03 IST2024-12-26T19:02:20+5:302024-12-26T19:03:20+5:30

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून अभिवादन, दुर्मिळ छायाचित्रे खुली

Inauguration of the memorial of Karnataka Kesari freedom fighter Gangadharrao Deshpande in Belgaum | बेळगाव येथे कर्नाटक केसरी,स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन

बेळगाव येथे कर्नाटक केसरी,स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन

राम मगदूम, लोकमत न्यूज नेटवर्क,बेळगाव: १९२४ मध्ये बेळगावात महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव देशपांडे यांच्या रामतीर्थनगर येथील स्मारकाचे उद्घाटन गुरुवारी (२६) सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पार पडला. 'गांधी भारत - १००'कार्यक्रमाच्या अंतर्गत शंभर वर्षांपूर्वी पार पडलेल्या येथील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. १५ गुंठे जागेत बांधण्यात आलेल्या या स्मारकासाठी १ कोटी ५८ लाख रूपये इतका खर्च आला आहे.

स्मारकात दिवंगत देशपांडे यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे.तसेच बेळगाव अधिवेशन,म.गांधीजी यांच्या हुदली येथील आठवड्याच्या वास्तव्यात पार पडलेले ग्रामोद्योग प्रदर्शन आणि गांधीजींच्या जीवनातील अन्य दुर्मिळ छायाचित्रे याठिकाणी लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून या स्मारकाचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी स्मारकातील देशपांडे यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.तसेच तेथील दुर्मिळ छायाचित्रेदेखील आवर्जून पाहिली.

यावेळी कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, एम. बी. पाटील, एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरण प्रकाश, के. एच. मुनियप्पा, आमदार असिफ तथा राजू सेठ, चन्नराज हट्टीहोळी, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, माहिती खात्याचे सचिव बी. बी. कामेरी, आयुक्त हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माहिती खात्याचे संयुक्त संचालक मंजुनाथ डोळ्ळीन, उपसंचालक गुरुनाथ कडबुर आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of the memorial of Karnataka Kesari freedom fighter Gangadharrao Deshpande in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.