तिसवाडी मराठी संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन
By admin | Published: April 11, 2015 01:40 AM2015-04-11T01:40:18+5:302015-04-11T01:40:18+5:30
तिसवाडी : तिसवाडी तालुका मर्यादित मराठी संगीत नाट्यस्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक तथा बालभवन केंद्राचे सदस्य हेमंत गोलतकर यांच्या हस्ते करमळी येथे नुकतेच करण्यात आले.
Next
त सवाडी : तिसवाडी तालुका मर्यादित मराठी संगीत नाट्यस्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक तथा बालभवन केंद्राचे सदस्य हेमंत गोलतकर यांच्या हस्ते करमळी येथे नुकतेच करण्यात आले.करमळी येथील श्री कमलावती रवळनाथ देवीच्या सभागृहात तिसवाडी कलामंच आणि कला व संस्कृतीच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या तिसवाडी तालुका मर्यादित स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र उसगांवकर, उपाध्यक्ष चिदानंद मडकईकर, तसेच पंचायतीचे प्रताप नाईक, विदेश मडकईकर, स्पर्धेचे परिक्षक नागेश च्यारी व दिगंबर काणकोणकर हजर होते.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गोलतकर म्हणाले, की अशा नाट्य स्पर्धातून आपली संस्कृती तसेच संगीत नाटकांची पंरपरा जिवंत राहते. प्रत्येक तालुक्यामार्फत अशा स्पर्धेचं आयोजन करून नाट्यसृष्टी अजरामर करण्याचे काम अशा संस्था करीत असतात. बालभवन केंद्रामार्फतही लहान मुला-मुलींना नाट्य तसेच इतर कलांचे शिबीरांचे आयोजन करण्यात येते असे ते म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष उसगांवकर यांनी स्वागत केले व आपले मनोगत प्रकट केले. कार्यक्रमाचे संपूर्ण सुत्रसंचालन सचिव संदीप नाईक यांनी केले. तुषार बोरकर यांनी आभार मानले. त्यानंतर महालक्ष्मी नाट्य मंडळ वडाभाट नेवरा या संस्थेने संगीत पंढरीची वाडी या नाटकाचा प्रयोग सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.फोटो ओळी-करमळी येथे आजोजित केलेल्या तिसवाडी तालुका मर्यादित संगीत मराठी नाट्य स्पर्धेचे उद्घाटन करताना हेमंत गोलतकर. सोबत संस्थेचे अध्यक्ष उसगांवकर व इतर. (छाया : श्रीकृष्ण हळदणकर)