संसर्ग होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षा कमी, एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७५ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 01:25 AM2020-10-20T01:25:22+5:302020-10-20T06:54:24+5:30

सोमवारी कोरोनाचे ५५ हजार नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांची एकूण संख्या ७५,५०,२७८ झाली. एकूण बरे झालेल्यांची संख्या ६६,६३,६०८ आहे. (corona patients)

The incidence of corona is less than eight per cent and the total number of corona patients is over 75 lakh | संसर्ग होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षा कमी, एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७५ लाखांवर

संसर्ग होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षा कमी, एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७५ लाखांवर

Next


नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रकारांचे प्रमाण सलग चौथ्या दिवशी आठ टक्क्यांपेक्षा कमी होते. कोरोनाचा फैलाव कमी होत असल्याची ही चिन्हे आहेत, असे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. 

सोमवारी कोरोनाचे ५५ हजार नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांची एकूण संख्या ७५,५०,२७८ झाली. एकूण बरे झालेल्यांची संख्या ६६,६३,६०८ आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या तुलनेत ८८.२६ टक्के आहे. देशात ७,७२,०५५ कोरोना रुग्ण उपचार घेत असून सलग चौथ्या दिवशीही हा आकडा ८ लाखांहून कमी होता. उपचार घेत असलेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १०.२३ टक्के आहे.

Web Title: The incidence of corona is less than eight per cent and the total number of corona patients is over 75 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.